मुंबई, 8 डिसेंबर : अल्लू अर्जुन (allu arjun) अभिनित ‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पहायला मिळते आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे मराठामोळा अभिनेता श्रेयस (shreyas talpade) तळपदे देखील याचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रेयस तळपदेने सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिलेली नाही.
पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अल्लू अर्जुनच्या भूमिकेला श्रेयसने आपल्या आवाजात डब केलं आहे. त्यामुळे श्रेयस या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असलेला पाहायला मिळतो आहे. याअगोदर श्रेयसने ‘द लॉयन किंग’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सिम्बाचा बेस्ट फ्रेंड टीमॉनच्या पात्राला आपला आवाज दिला होता. आणि आता प्रथमच तो तेलुगू चित्रपटासाठी आणि तेही नायकाच्या मुख्य पात्राला आपला आवाज देणार आहे. श्रेयस तळपदे सोशल मीडिया पोस्ट करत याची माहिती दिली आहे. श्रेयस तळपदेचा आवाज ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
वाचा : 'लेडी रणवीर सिंह'; विचित्र फॅशनमुळे उर्फी जावेद पुन्हा ट्रोल
सध्या श्रेयस तळपदे झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशची भूमिका साकरत आहे. श्रेयसने ईकबाल, गोलमाल अगेन, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, पोस्टरबॉईज, हाऊसफुल 2, ओम शांती ओम यासारख्या हिंदी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी मालिकेत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या श्रेयस तळपदेने अभिनयाच्या जीवावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता परत तो छोट्या पडद्याकडे वळला आहे. येथे देखील त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
View this post on Instagram
पुष्पा हा तेलुगू चित्रपट सुकुमार बनरेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. चंदन तस्कर विरप्पनच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Allu arjun, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Tollywood