मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi 4: श्रेयस तळपदेनं मालिकेला ठोकला रामराम? बिग बॉसमध्ये ग्रँड एंट्री

Bigg Boss Marathi 4: श्रेयस तळपदेनं मालिकेला ठोकला रामराम? बिग बॉसमध्ये ग्रँड एंट्री

श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 4

श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 4

अभिनेता श्रेयस तळपदेची बिग बॉस मराठी 4मध्ये एंट्री होणार आहे. श्रेयसनं माझी तुझी रेशीमगाठ मालिका सोडली का असा प्रश्न आता समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  06 ऑक्टोबर : झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मालिका पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मालिकेची वेळ फक्त बदलण्यात आली आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिका आता संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. मालिका पुन्हा सुरू झाल्यानं कलाकारांनी आनंद व्यक्त केला होता. पण मालिकेतून एक कलाकार कमी होणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहे. बिग बॉसचा प्रोमो रिलीज झाला असून श्रेयस घरात एंट्री घेताना दिसत आहे. बिग बॉसमध्ये आल्यानं श्रेयसनं माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला रामराम ठोकला का? असा प्रश्न समोर आला आहे. मात्र श्रेयसनं याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाहीये.

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसच्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते.  अखेर 16 स्पर्धक बिग बॉसच्या घरात गेले आहेत. गेमला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात आजवर अनेक स्पर्धकांनी त्यांच्या वेगळ्या अंदाजात घरात एंट्री घेतली आहे. पण आज बिग बॉसच्या घरात 'झुकेगा नही साला', म्हणत अभिनेत्रा श्रेयस तळपदे एंट्री घेणार आहे.

हेही वाचा - Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस च्या घरातील स्पर्धकांची संपूर्ण लिस्ट

रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये श्रेयस तळपदे मोठ्या स्टाइलमध्ये अनोख्या अंदाजात घरात एंट्री घेताना दिसतोय. 'या घरानं अनेक एंट्री पाहिल्या असतील. आता या घरात माझीसुद्धा धमाकेदार एंट्री होत आहे. त्यामुळे बघत रहा बिग बॉस मराठी', असं म्हणत श्रेयसनं बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे.

बिग बॉसच्या घरात ऑलरेडी 16 अतरंगी कलाकार आहेत. त्यात श्रेयस तळपदेच्या एंट्रीनं काय हंगामा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.सोशल मीडियावर प्रोमो रिलीज होताच चाहत्यांनी मात्र श्रेयस प्रमोशनसाठी आल्याचं म्हटलं आहे.  श्रेयसचा नवा सिनेमा आपडी धापडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी श्रेयस आल्याचं म्हटलं जात आहे. आता श्रेयस नक्की स्पर्धक म्हणून घरात आलाय की सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे बिग बॉसच्या येणारा एपिसोड पाहूनच कळणार आहे.  त्याचप्रमाणे श्रेयसला घरात पाहून इतर स्पर्धक काय प्रतिक्रिया देणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे.

श्रेयसचा आपडी धापडी हा सिनेमा 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  साधी सोप्पी आणि सहदसुंदर आपल्या फॅमिलीची हलकी फुलकी गोष्ट सांगणार हा सिनेमा आहे. सिनेमात श्रेयसबरोबर अभिनेत्री मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधवही मुख्य भूमिकेत आहे.

First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news