Big Boss मराठीमधील 'ही' अभिनेत्री चढणार दुसऱ्यांदा बोहल्यावर; मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडणार लग्न

Big Boss मराठीमधील 'ही' अभिनेत्री चढणार दुसऱ्यांदा बोहल्यावर; मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडणार लग्न

बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) मध्ये आपल्या उत्तम खेळामुळे लोकांचं मन जिंकलेली मराठी अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. तर काही अभिनेत्रींनी साखरपुडा उरकला आहे. लॉकडाऊनमध्ये लग्न करणाऱ्या कलाकारांमध्ये आणखी एका नाव जोडलं गेलं आहे. ते नाव आहे, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचं.

येत्या रविवारी, 11 ऑक्टोबरला शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शर्मिष्ठाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. "तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू देत" अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. तेजस देसाई (Tejas Desai) असं शर्मिष्ठाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. शर्मिष्ठा आणि तेजस यांनी जून महिन्यात साखरपुडा केला होता. शर्मिष्ठा अतिशय साध्या पद्धतीने, मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये लग्न करणार आहे.

शर्मिष्ठाच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. तिचं केळवण आज पार पडलं. तिच्या घरातल्या मोजक्याच माणसांच्या उपस्थितीत ग्रहमक केळवणाचा सोहळा पार पडला.

शर्मिष्ठा अतिशय उत्तम अभिनेत्री आहे. बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) मध्ये शर्मिष्ठा सहभागी झाली होती.

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.'जुळून येती रेशीमगाठी'आणि 'उंच माझा झोका' अशा अनेक मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 8, 2020, 4:44 PM IST

ताज्या बातम्या