मुंबई, 10 नोव्हेंबर- मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) पुन्हा एकदा वेबमाध्यमातून प्रेक्षाकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. संतोषने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आगामी वेबसिरीजबाबत माहिती शेअर केली आहे. ‘धारावी बॅंक’ असं संतोषच्या आगामी वेबसिरीजचं नाव आहे.
संतोष जुवेकर यांनी इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की,लचला आता सगळ्या सुट्टया संपल्या.... चला कामाला लागा आता. Lights.... Camera..... Sound....Action!!! हे कॅप्शन देत त्याने आगामी प्रोजेक्टविषयी शेअर केलं आहे. भोसले नंतर संतोषची ही दुसरी हिंदी वेबसिरीज आहे. यापुर्वी संतोष भोसले या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिरीजमध्ये त्याच्यासोबत मनोज वाजपेयी देखील होते.
वाचा : Naacho Naacho Song : RRR सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज; Jr NTR-Ram Charan चा भन्नाट
मालिका, चित्रपट, नाटक सर्व प्लॅटफॉर्म्सवर आपली जादू दाखवणारा संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय पाहायला मिळतो. अनेक निरनिराळ्या पोस्ट तो शेअर करत असतो. त्याच्या आगामी प्रोजक्टविषयी माहिती तो देत असतो. सोशल मीडियावर अनेकदा तो आपले वर्कआउट व्हिडीओस शेअर करत असतो. त्यानंतर त्याला अनेक कमेंट्सही मिळतात.
View this post on Instagram
संतोष जुवेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच संतोषचा ‘हिडन’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये (Marati Movie) दमदार भूमिका साकारल्या. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.
वाचा :स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचा हा चेहरा
आता मोठमोठे कलाकार वेबसिरिजकडे वळत आहेत. मराठी कलाकार देखील या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. संतोषच्या पहिल्या सिरिजला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता यामध्ये त्याची भूमिका कशी आहे याबदद्ल त्यानं खुलासा केलेला नाही. प्रेक्षक मात्र त्याला नव्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.