मुंबई, 21 मार्च- मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. गेल्या अनेक दिवसांपासून संतोष जुवेकर कोणत्या न कोणात्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानं कोणतीही पोस्ट शेअर केली की ती पोस्ट अल्पावधीतच व्हायरल होत असलेली पहायला मिळते. अशातच संतोष जुवेकरनं शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट अनेकांचं लक्ष वेधत घेत असून सोशल मीडियावर याविषयी चर्चाही होताना दिसतेय. नेमकी त्याची काय पोस्ट आहे हेच आपण पाहणार आहे.
संतोषने एका गाण्यावर व्हिडिओ रील पोस्ट केलं आहे. हे रील शेअर करताना त्याने लिहिले आहे की, खूप प्रयत्नानंतर या गाण्याचे शब्द पाठ झाले.पण या शब्दांचा अर्थ अजून कळला नाही.बहुतेक हे गाणं आपल्या मराठी गाण्यावरून घेतलं असणार " कसं काय पाहून बर हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का."( चाल तेवढी आपल्या ओरिजनल गाण्यासारखी असती तर अजून मजा आली असती.)चला आता ज्यांना ट्रोल करायचंय त्यांनी करा तुम्हाला काम मिळालय आज,आणि ज्यांना आवडलं त्यांना i love u ❤ सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या रीलवरुन आपल्याला ट्रोल करण्यात याचा संतोषला जणू अंदाजच आल्याचं त्यानं या पोस्टमध्ये मान्य करत त्याने ट्रोलर्सना खुलं आव्हान केलं आहे.
वाचा-सब्यासाची, मनीष मल्होत्राला डावलत स्वरा भास्करने का निवडला पाकिस्तानी डिझायनर?
संतोषच्या या पोस्टवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकानं मस्करी करत लिहिलं आहे, जय महाराष्ट्र, आपला माणूस... संतोष दादा, कडक ना भाऊ तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, गाण ऐकल पण कोण कोणाची वाजवतो तेच कळत नाय. तर आणखी एकानं देखील अशीच काहीशी मजेदार कमेंट केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, कानात खाजवल्या सारखं झालं
View this post on Instagram
मालिका, चित्रपट, नाटक सर्व प्लॅटफॉर्म्सवर आपली जादू दाखवणारा संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय पाहायला मिळतो. अनेक निरनिराळ्या पोस्ट तो शेअर करत असतो. त्याच्या आगामी प्रोजक्टविषयी माहिती तो देत असतो. सोशल मीडियावर अनेकदा तो आपले वर्कआउट व्हिडीओस शेअर करत असतो. त्यानंतर त्याला अनेक कमेंट्सही मिळतात.
संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये (Marati Movie) दमदार भूमिका साकारल्या. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.