मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Majhi Tujhi Reshimgath मधील या प्रसिद्ध अभिनेत्याची मालिकेतून एक्झिट

Majhi Tujhi Reshimgath मधील या प्रसिद्ध अभिनेत्याची मालिकेतून एक्झिट

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आता हा प्रसिद्ध अभिनेता दिसणार नाही. यामागचं कार देखील समोर आलं आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आता हा प्रसिद्ध अभिनेता दिसणार नाही. यामागचं कार देखील समोर आलं आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आता हा प्रसिद्ध अभिनेता दिसणार नाही. यामागचं कार देखील समोर आलं आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई , 16 ऑक्टोबर : माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) ही झी मराठीवरील मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेतील परीचे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. यासोबतच या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाने मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अर्थात संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, मानसी मागिकर, अजित केळकर या अभिनयाची उत्तम जाण असलेल्या कलाकारांचीही साथ त्यांना मिळाली आहे. मात्र या मालिकेतील एक  प्रसिद्ध आणि सर्वांचा लाडका अभिनेता या मालिकेत दिसणार नाही. समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) आता या मालिकेतून प्रेक्षकांना दिसणार नाही. यामागचे कारण देखील समोर आलं आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने मनोरंजन क्षेत्रावरील निर्बंध हटवल्याने नाटक आणि चित्रपट आता प्रेक्षकांना नाट्यगृहात, चित्रपट गृहामध्ये पाहायला मिळणार आहे. याची उत्सुकता मराठी सृष्टीसह हिंदी सृष्टीला आनंदित करणारी आहे. याच कारणामुळे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काही काळासाठी दिसणार नाही.
संकर्षण कऱ्हाडे याने अभिनित केलेलं तू म्हणशील तसं… हे नाटक लवकरच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निर्बंध उठवल्यामुळे 23ऑक्टोबर रोजी या नाटकाचा प्रयोग बोरिवली येथील प्रबोधन ठाकरे आणि 24 ऑक्टोबर रोजी डॉ काशीनाथ घाणेकर, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे संकर्षण कऱ्हाडे सध्या आपल्या नाटकाच्या दौऱ्यात व्यस्त असणार आहे. याचमुळे तो माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत काही काळासाठी तरी शूटिंगसाठी येऊ शकणार नाही. वाचा : कोरोना लसीकरणाच्या सेलिब्रेशनची तयारी; Kailash kher यांच्या आवाजातील Corona vaccination anthem पाहिलं का? तू म्हणशील तसं.. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांच्या गौरी थेटर्सच्या माध्यमातून केली जात आहे. या नाटकाचे लेखन स्वतः संकर्षण कऱ्हाडेने केले असून त्याने ही संकल्पना प्रशांत दामले यांच्याकडे बोलून दाखवली होती. प्रशांत दामले यांनी देखील या नाटकाच्या निर्मितीला आपला होकार कळवला होता. तर दिग्दर्शनाची धुरा प्रसाद ओक याने निभावल्याने ह्या नाटकाचे सूर छान जुळून आलेले पाहायला मिळाले. वाचा : 'Chala Hawa Yeu Dya' शोला या अभिनेत्याचा रामराम; दिसणार हिंदी कार्यक्रमात या दौऱ्यामुळे संकर्षण आणि भक्ती देसाई यांनी अभिनय करत असलेल्या मालिकांमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. या दौऱ्यातून जसा वेळ मिळेल तसे ते मालिकेतून तुरळक दिसतीलही किंव पुनरागमन करण्याची देखील शक्यता आहे.
First published:

Tags: Marathi entertainment, Tv serial, Zee Marathi, Zee marathi serial

पुढील बातम्या