मुंबई, 18 मार्च- अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील संकर्षण कऱ्हाडे याचंही नाव या पंक्तीत प्रामुख्याने घेता येईल. संकर्षणच्या मोकळ्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात त्याचे चाहते आहेत. सध्या संकर्षण मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा तीनही माध्यमात जोरदार काम करत आहे.
संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्याच्या कामाबद्दलच्या अपडेट तो शेअर करताना दिसतो. अनेकदा तो नाटकाच्या प्रयोगावेळी घडलेला एकदा किस्सा चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतीच संकर्षण कऱ्हाडे याने एक पोस्ट केली आहे. त्याची ही धडधड वाढवणारी पोस्ट वाचून चाहत्यांना देखील चिंता वाटू लागली आहे. त्याची ही पोस्ट कशासाठी आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
वाचा-एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये करणी सेनेचा तुफान राडा; चाहत्यांवर लाठीचार्ज
संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,“नियम व अटी लागू….” आज शुभारंभ …. ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻पोटात गोळा .. छातीत धडधड .. जिभेला कोरड.. 😅😀 सगळं होत असतांना मनांत खूप आनंद आहे ..चंद्रकांत कुलकर्णी सरांचं दिग्दर्शन आणि प्रशांत दामलेंची निर्माता म्हणुन भक्कम साथ आहेच..आणि आम्हा तिनही कलाकारांची खूप मेहनत .. 🙏🏻 आता तुमचा प्रतिसाद हवा आहे.. नक्की या.. वाट पाहातो..भेटूच ..आज शनी. १८ मार्च रात्री ८.३० डोंबिवली.. त्याच्या या पोस्टवरून लक्षात आलेच असेल की, नवीन नाटकाच्या प्रमोशनासाठी त्याने अशी धडधड वाढवणारी पोस्ट केली आहे. सोबत त्याने प्रसाद दामले आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. संकर्षण आता नियम व अटी लागू या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज १८ मार्चपासून या नाटकाचा शुभारंभ होत आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
View this post on Instagram
सोयीनुसार नियमातून पळवाट काढताना अटींचा भंग होऊ शकतो. हे माहीत असूनही नियम व अटी लागू केल्या जातात. त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय? हाच भन्नाट विषय घेऊन प्रशांत दामले निर्मित ‘नियम व अटी लागू’ हे आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक रंगभूमीवर येत आहे.
संकर्षण कऱ्हाडे नुकताच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत दिसला होता. या मालिकेनं संकर्षणला घराघरात लोकप्रिय केलं. संकर्षण त्याच्या कामातून वेळ काढत सुंदर कविता सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या कविता प्रचंड व्हायरल होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.