मुंबई, 25 फेब्रुवारी- अभिनेता संदीप पाठकाला सर्वजण त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखतात. संदीप पाठक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. समाजातील विविध घटनांवर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतो. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरत असतात. नुकतीच संदीपन एक पोस्ट केली आहे ज्यामुळं तो चर्चेत आली आहे.
संदीप पाठकने नुकतचं एक ट्वीट केलं आहे. सध्या त्याचं ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, “मा.बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय…” असं संदीपने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये संदीपने राज्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, आप, राष्ट्रवादी अशा सर्वच राजकीय पक्षांना टॅगही केलं आहे.
वाचा-'तुमच्या मुलीचं..'लग्नाच्या खरेदीसाठी गेली अन् 'त्या' प्रश्नानं भांबावली अरुंधती
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. आता पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे. अशातच संदीपनं केलेलं ट्वीट सगळ्यांचे लक्षवेधून घेत आहे.
मा. बाळासाहेब ठाकरें ची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @INCIndia @AAPMumbai
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) February 24, 2023
संदीप पाठकने केलेलं हे ट्वीटवर नेटकऱ्यांनी देखी कमेंट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. अनेकांनी कमेंटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर काहींनी खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान होऊ शकतात, असं म्हटलं आहे.
संदीप मुळचा मराठवाड्याचा आहे. अभिनयासाठी त्याने मुंबईची वाट धरली. आता 22 वर्षे झाली तो मुंबईतच आहे. त्याने आजपर्यंत अनेक मालिका, सिनेमा तसेच नाटकात काम केलं आहे. 'वऱ्हाड निघालंय लंडनला' हे आधीच गाजलेले नाटक पुन्हा साकारण्याची संधी संदीपला मिळाली. या नाटकाने संदीपला एक वेगळी ओळख करून दिली. मध्यंतरी एका मुलाखतीत. संदीपनं त्याला करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात सेटवर चुकीची वागणूक मिळाल्याचे सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb Thackeray, Entertainment, Marathi entertainment, Shivsena