Home /News /entertainment /

'काहे दिया परदेस' फेम अभिनेता होणार बाबा ; फोटो पोस्ट करत दिली गोड बातमी

'काहे दिया परदेस' फेम अभिनेता होणार बाबा ; फोटो पोस्ट करत दिली गोड बातमी

झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता समीर खांडेकर ( sameer khandekar) देखील लवकरच बाबा होणार आहे.

  मुंबई, 22 जानेवारी- या वर्षी अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे तर काहींच्या घरी चिमुकल्यांचे आगमान झालं आहे. अनेक कलाकारांनी याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आता झी मराठीवरील काहे दिया परदेस या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता समीर खांडेकर ( sameer khandekar) देखील लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर बायकोच्या डोहाळे जेवणाचे ( baby shower )फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी दिली आहे. विशेष म्हणजे त्यानं या पोस्टल जी कॅप्शन दिली आहे ती सध्या चर्चेत आहे. अभिनेता समीर खांडेकरने इन्स्टार बायकोसोबतचे डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, ‘लवकरच रंगभूमीवर’ सध्या त्याची ही कॅप्शन जोरा त चर्चेत आहे. शिवाय त्याच्या या पोस्टवर सायली संजीव, स्पृहा जोशी, तन्वी पालव, मयुरी देशमुख, अन्विता फलटणकर, कुंजिका काळवीट, रेश्मा शिंदे, ऋतुजा बागवे , स्नेहल शिदम अशा अनेक अभिनेत्रींनी अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
  अभिनेता समीर खांडेकर झी मराठीवरील नुकतीच निरोप घेतलेली ती परत आलीये या मालिकेत हनम्याची भूमिका साकारताना दिसला. ही मालिका भयपटावर आधारित असली तरी हनम्याचा मिश्किल स्वभाव या मालिकेतून दाखवण्यात आला होता. यासोबत त्याने काहे दिया परदेस या मालिकेत वेणूगोपालची दाक्षिणात्य भाषेचा बाज असलेली भूमिका साकारली होती. मालिकेतून वेणूचे पात्र धमाल मजामस्ती करणारे होते त्यामुळे ही भूमिका उठावदार ठरली होती. वैजू नं 1 या स्टार प्रवाहवरील मालिकेत समीर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला होता. वाचा-संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ दिसणार नव्या मालिकेत एकदम कलरफुल्ल भूमिकेत समीर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो त्याचे काही व्हिडिओ व फोटो शेअर करत असतो. अनेकादा तो काही फनी पोस्ट करत असतो.   आपली सोसल वाहिनी या सेगमेंटमधून अनेक फनी व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याचे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः समीर खांडेकर याने केले असून त्याची पत्नी वैभविने निर्माती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.  या व्हिडिओंना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या