मुंबई, 29 नोव्हेंबर: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक (prasad oak)कायचम त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातो. सोशल मीडिायवर देखील प्रसाद त्याच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतीच त्याने एक पोस्ट केली आहे ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ही पोस्ट कुणासाठी असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
प्रसादने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. त्यानं यामध्ये निळ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे. या शर्टवर जो मजकूर लिहिला आहे त्यामुळे खरं तर तो चर्चेत आला आहे. शर्टवर लिहिलं आहे की, #पुणेकर आमच्या वेळी हे नव्हतं.. यासोबतच फोटोला देखील त्यानं अशीच भन्नाट कॅप्शन दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, #आमच्यावेळी हे नव्हतं असं सतत म्हणणारे किती लोक आहेत तुमच्या आजूबाजूला ??
वाचा: पहिल्या शेवंताच्या तुलनेत नव्या अभिनेत्रीत काय आहे खास? UK मधून शिक्षण आणि...
प्रसादच्या या प्रश्नावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. काहींच्या कमेंट या लक्षवेधी ठरत आहेत. एकाने म्हटलं आहे की, आजू-बाजू काय सांगताय .....आपण स्वतः हे आप्ल्या मुलांना सांगतो. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, पक्के पुणेकर ❤️ तर आणखी एकाने म्हटलं आहे की, म्हणजे कुठली वेळ?? मग आत्ताची वेळ कोणाची? अशा अनेक मजेदार कमेंट या पोस्टवर आल्या आहेत.
View this post on Instagram
दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने आपली छाप सोडली आहे. अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची संपर्कात असतो. आपला आगामी सिनेमा, नाटक यांची माहिती तो सोशल मीडियावर चाहत्यांना देत असतो. तसेच प्रसाद आपल्या कुटुंबीयांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.'धुरळा', 'हिरकणी', 'ये रे ये रे पैसा २', 'फर्जंद' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसाद सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. हिरकणी या सिनेमाची निर्मिती प्रसादने केली होती. आतापर्यंत 70 ते 75 सिनेमे, 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये प्रसादने काम केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.