मुंबई, 19 मार्च- प्रसाद ओक सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. तो त्याचे विविध फोटो तसेच व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असतो. शिवाय त्याच्या कामाबद्दल अपडेट देखील शेअर करत असतो. प्रसादनं अभिनयासोबत दिग्दर्शनात देखील यशस्वी पाऊल ठेवलं आहे. पण त्याच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. करिअर म्हणून जेव्हा त्यानं अभिनय हे क्षेत्र निवडलं त्यामुळे त्याला नातेवाईकांकडून विरोधाचा सामना करावा लागला होता.याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
सादने नुकतीच ‘इसापनीती’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत त्याला नातेवाईकांकडून मिळालेली वागणूक याबद्दल सांगितलं. शिवाय या कठीण काळात बायको मंजिरीची त्याला कशी साथा लाभली, याचा देखील प्रसादने उल्लेख केला.
वाचा-दाक्षिणात्य या' अभिनेत्री सुंदरतेत बॉलिवूड अभिनेत्रींना देताता मात, अभिनयात...
प्रसाद यावेळी म्हणाला की, नातेवाईक हा अत्यंत किचकट आणि अत्यंत वैताग आणणारा प्रकार आहे. सुरुवातीच्या काळात नातेवाईकांकडून अभिनय हे काय क्षेत्र आहे? यात काय करिअर होणार आहे का? यापेक्षा चांगली बँकेत नोकरी बघितली असतीस..तर असं मला सुनावलं जायचं. आज तेच नातेवाईक त्यांच्या मुलांना माझ्याबरोबर फोटो काढायला पाठवतात. हेही मला आवडत नसल्याचे सांगितलं. नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो. त्यांच्याकडून कधीच काही चांगलं मला मिळालं नाही, असं यावेळी प्रसाद म्हणाला.
बायको मंजिरीचं देखील प्रसादनं यावेळी कौतुक केलं. तो म्हणाला की, मला जे काही दिलं ते माझ्या बायकोने दिलं. माझ्या शिक्षकांनी माझ्यावर संस्कार केले. आईने मला गाणं दिलं. पण नातेवाईकांनी मला काहीच दिलं नाही”. “पण मंजिरीने या सगळ्या नातेवाईकांना सांभाळलं आहे. नातेवाईकांसमोर माझी बाजू ती सावरत राहिली. सगळा भार तिने एकटीने पेलला आहे. माझ्या यशात मंजिरीचा 100 टक्के वाटा आहे. 1996 साली तिने मला पुणे सोडून मुंबईला जाण्यास सांगितलं. तिच्यामुळेच आज मी इथे आहे.
View this post on Instagram
प्रसाद पुढे म्हणाला की, मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी 1998 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरही एक वर्ष मी एकटाच मुंबईत होतो. त्यानंतर 1999 मध्ये मंजिरी मुंबईला आली. त्यानंतर आमचा संसार सुरू झाला. या संपूर्ण काळात घर, मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण आणि नातेवाईक हे सगळं तिने सांभाळलं.
प्रसाद नेहमीच मंजिरीसोबत काही भन्नाट रील सादर करत असतो. सोशल मीडियावर तो मंजिरीची नेहमी मस्करी करताना दिसतात. पण खऱ्या आयुष्यात दोघांच एकमेंकावर तितकच प्रेम आहे. मंजिरी नेहमीच प्रसादला पाठिंबा देत आली आहे. त्याच्या प्रत्येक कामात त्याला ती मदत करताना दिसते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.