मुंबई, 25 मार्च- प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचे काही भन्नाट व्हिडिओ तसेच फोटो देखील चाहत्यांसोबच शेअर करत असतो. सध्या महागाई इतकी वाढली आहे की, सोशल मीडियावर देखील याचे काही मीम्स देखील व्हायरल होत असतात. प्रसाद ओकनं देखील टॅक्ससंदर्भात नुकतीच एक पोस्ट केली आहे. सध्या प्रसादची पोस्ट सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रसाद ओक बायको मंजिरी ओक संदर्भात सोशल मीडियावर भन्नाट रील सादर करताना दिसतो. मंजिरी ओक देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सध्या प्रसादनं मंजिरीसोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत एक भन्नाट कॅप्शन देखील दिली आहे. सध्या या कॅप्शननं सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. सोबत रील देखील मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रसाद ओकनं नेमकं पोस्टमध्ये काय म्हटलं आहे..?
वाचा-बॉलिवूड सिनेमांची कथा मालिकांनी केल्या कॉपी; कोणी ठरल TRPत अव्वल, तर कोणी फ्लॉप
सध्या सोशल मीडियावर रील करण्यासाठी एका जुन्या गाण्याचा जोरदार वापर सुरू आहे. 'कमाता हू बहोत कुछ पर.. कमाई डूब जाती है.. कुछ इन्कम टॅक्स ले जाता है.. कुछ ईडी उडाती है ' असे या गाण्याचे बोल आहेत. 1954 साली आलेल्या 'अधिकार' चित्रपटातील गाणे आजच्या परिस्थितीला चांगलेच लागू होत आहे. त्यामुळे या गाण्यावर जोरदार रिल्स सुरू आहेत. त्यामुळे प्रसाद ओकनं बायको मंजिरी या गाण्यावर रील करण्याचा मोह आवरला नाही. सध्या हे रील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्रसाद ओकनं ही रील शेअर करत म्हटलं आहे की,सरकारनी ठरवलं तर टॅक्स कंट्रोल होऊ शकतो...पण बायको????????😜😜😜
View this post on Instagram
प्रसाद अभिनयाशिवाय दिग्दर्शनाची यशस्वी धुरा सांभाळताना दिसला. त्याच्या चंद्रमुखी सिनेमानं अफाट यश मिळवलं. शिवाय त्याचा धर्मवीर सिनेमा देखील हिट ठरला. त्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. याशिवाय तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सगळ्या प्रगतीत त्याच्या पत्नी मंजिरीची त्याला महत्त्वाची साथ मिळाली. नुकतचं एका मुलाखतीत त्यानं याबद्दल मंजिरीचं कौतुक देखील केलं होत.
प्रसाद ओकने आजपर्यंत दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, गायन ह्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांमध्ये व अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे.प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा चांगलाच गाजला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.