मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रसाद ओकच्या 'नुसता माज' पोस्टपेक्षा पत्नी मंजिरीच्या कमेंटची जास्त चर्चा

प्रसाद ओकच्या 'नुसता माज' पोस्टपेक्षा पत्नी मंजिरीच्या कमेंटची जास्त चर्चा

 मागच्या काही दिवसांपासून विविध मजकूर लिहिलेले टी शर्ट घालून अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) फोटोशूट करत आहे. या फोटोशूटमुळे प्रसाद ओक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

मागच्या काही दिवसांपासून विविध मजकूर लिहिलेले टी शर्ट घालून अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) फोटोशूट करत आहे. या फोटोशूटमुळे प्रसाद ओक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

मागच्या काही दिवसांपासून विविध मजकूर लिहिलेले टी शर्ट घालून अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) फोटोशूट करत आहे. या फोटोशूटमुळे प्रसाद ओक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 5 डिसेंबर : मागच्या काही दिवसांपासून विविध मजकूर लिहिलेले टी शर्ट घालून अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) फोटोशूट करत आहे. या फोटोशूटमुळे प्रसाद ओक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या सगळ्यामध्ये त्याची आजची पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या पोस्टवर सेलेब्सच्या तर कमेंट आल्याच आहेत पण लक्षवेधी कमेंट ठरतेय ती त्याची पत्नी मंजिरी ओकची. प्रसाद ओकने निळ्या रंगाचा टी शर्ट घालून एक फोटो पोस्ट केला आहे.यावर पांढऱ्या अक्षरात नुसता माज ! असं लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलेब्स देखील कमेंट करत आहेत. त्याच्या यो पोस्टवर अमृता खानविलकरने कमेंट करत म्हटलं आहे की, पण कशासाठी तर एका चाहत्याने म्हटलं आहे घर सोडून करायचा हं!!! तर आणखी एका चाहत्या म्हचलं आहे की, मराठी असल्याचा ना...मात्र या सगळ्या लक्षवेधी कमेंट ठरत आहे प्रसादची पत्नी मंजिरी ओकची. मंजिरी म्हटलं आहे की,कर कर पण बाहेर हं .. वाचा : Video : रितेश- सिद्धार्थची महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर ग्रेट भेट दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने आपली छाप सोडली आहे. अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची संपर्कात असतो. आपला आगामी सिनेमा, नाटक यांची माहिती तो सोशल मीडियावर चाहत्यांना देत असतो.
तसेच प्रसाद आपल्या कुटुंबीयांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.'धुरळा', 'हिरकणी', 'ये रे ये रे पैसा २', 'फर्जंद' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकलेला प्रसाद सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. हिरकणी या सिनेमाची निर्मिती प्रसादने केली होती. आतापर्यंत 70 ते 75 सिनेमे, 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये प्रसादने काम केले आहे. वाचा : video : मीरा-उत्कर्षमध्ये काहीतरी शिजतंय; घरातील सदस्य करतायत उलट सुलट चर्चा प्रसादने  काल देखील त्याचा एक फोटो शेअर केला होता. त्यानं यामध्ये लाल रंगाचा टी शर्ट घातला होता. या शर्टवर जो मजकूर लिहिला होता त्यामुळे खरं तर तो चर्चेत आला. शर्टवर लिहिलं होते की, फक्त "लढ" म्हणा. आता कोणताही virus आला. कशीही परिस्थिती आली तरी स्वतःला..कुटुंबाला.. आणि जवळच्या प्रत्येक माणसाला. बजावून एकच सांगायचं... "लढ"
First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial

पुढील बातम्या