मुंबई, 31 मार्च- प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचे काही भन्नाट व्हिडिओ तसेच फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रसाद अभिनयाशिवाय दिग्दर्शनाची यशस्वी धुरा सांभाळताना दिसला. त्याच्या चंद्रमुखी सिनेमानं अफाट यश मिळवलं. शिवाय त्याचा धर्मवीर सिनेमा देखील हिट ठरला. त्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. याशिवाय तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो. विशेष म्हणजे प्रसादला त्याच्या धर्मवीर सिनेमातील भूमिकेसाठी नुकताच एक पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात त्याने एक खुलासा केला आहे. त्याच्या या खुल्याशाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
प्रसाद ओकनं धर्मवीर सिनेमात अनंत दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील प्रसाद ओकच्या अभिनयाचे सर्वांकडून कौतुक झालं. नुकताच या सिनेमातील भूमिकेसाठी प्रसाद ओकला यंदाचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्याला त्याच्या अवडती अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याकडून मिळाला. यावेळी मंचावर त्याने एक मोठा खुलासा केला. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
वाचा-आईला झाली लेकावर ओढवणाऱ्या संकटाची चाहूल; यशचा होणार मोठा अपघात?
प्रसाद ओक जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेला तेव्हा त्याला निवेदकानं एक प्रश्न केला. प्रसाद ओकनं या सिनेमासाठी जे काही पुरस्कार मिळाले आहेत ते ठेवण्यासाठी एक नवीन घर घेतलं आहे, हे खरं आहे का..?.यावर प्रसादनं देखील लगेचच प्रतिक्रिया दिली. प्रसाद म्हणाला..तथास्तू.. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होऊ..
View this post on Instagram
प्रसादनं हा भन्नाट व्हिडिओ शेअर करत म्हणालं आहे की, जून एक BLACK LADY घरात...!!!ती पण अशा LADY च्या हातून जिचा मी लहानपणापासून चाहता आहे. THE GORGEOUS @ashvinibhave 😍😍😍 पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार टीम #धर्मवीर @mangeshdesaiofficial आणि अर्थातच प्रविण तरडे...!!! त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय अनेकांनी प्रसादनं ज्याप्रमाणे भूमिकेत जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचं कौतुक केलं आहे.
प्रसाद ओकने आजपर्यंत दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, गायन ह्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांमध्ये व अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे.प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमा चांगलाच गाजला. शिवाय त्याच्या धर्मवीर सिनेमानं सर्वांचे मन जिंकलं. त्याच्या अभिनयाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.