Home /News /entertainment /

मिलिंद शिंदे यांना खऱ्या आयुष्यात व्हायचं होते 'देवमाणूस' मधील मार्तंड जामकर पण..

मिलिंद शिंदे यांना खऱ्या आयुष्यात व्हायचं होते 'देवमाणूस' मधील मार्तंड जामकर पण..

देवमाणूस मालिकेत अभिनेते मिलिंद शिंदे पोलिस आधिकारी मार्तंड जामकर यांची दमदार भूमिका साकारताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या या भूमिकेचे व अभिनयाचे कौतुक होत आहे.

  मुंबई, 16 मे- झी मराठीवरील देवमाणूस( devmanus ) या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची धमाकेदार एंट्री झाली आहे. अभिनेता मिलिंद शिंदे  ( milind shinde )  पोलिस अधिकाऱ्याची भूमिका अगदी अगदी चोख बजावताना दिसत आहे. मार्तंड जामकर यांच्या एंट्रीनंतर मालिका एका अतिशय रंजक वळणावर आली आहे. मार्तंड अजितकुमारला कसा धडा शिकवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आपल्या या वेगळ्या आणि दमदार भूमिकेबद्दल मिलिंद शिंदे म्हणाले, "मी एका चांगल्या भूमिकेची वाट बघत होतो. जास्तकरून खलनायक साकारल्यानंतर एक दमदार अशी भूमिका मार्तंड जामकरच्या रूपात माझ्या वाट्याला आली. एक इमानदार पोलीस अधिकारी ज्याच्यावर त्याच्या वरिष्ठांचा विश्वास आहे आणि तो कुठलीही केस तडीस नेतो अशी भूमिका मला देवमाणूस २ या लोकप्रिय मालिकेत साकारायला मिळाली याचा मला आनंद आहे." वाचा-रात्री पार्टीला निघाली जान्हवी; बघ्यांच्या गर्दीला 'बॉयफ्रेंड'ही नाही आवरू शकला मार्तंड जामकर ही भूमिका खास का आहे याचं कारण सांगताना मिलिंद शिंदे म्हणाले, "माझी आधी इच्छा होती कि मी आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हावं. जर मी अभिनेता नसतो झालो तर मी कदाचित आयएएस किंवा आयपीएस अधिकारी झालो असतो आणि तो अधिकारी हा मार्तंड सारखाच असता. मार्तंड जामकर प्रमाणेच इमानदार, तत्वांशी बांधील असणारा, गुन्हेगारांना अद्दल घडवणारा असाच अधिकारी मी झालो असतो." वाचा-सोनली कुलकर्णी मॅक्सिकोत साजरा करतेय सेकेंड मॅरेजचं थर्ड हनिमून, Photos Viral अभिनेते मिलिंद शिंदे यांनी आजवर खलनायकी ढंगाच्या भूमिका गाजवल्या आहेत. झी मराठीवरील ‘तू तिथे मी’ या मालिकेत मिलिंद शिंदे यांनी दादा होळकर ही भूमिका साकारली होती. त्यात ते सतत तांबडे बाबांची पूजा करताना दाखवले होते. तांबडे बाबांमुळे मिलिंद शिंदे यांना एक वेगळी ओळख मिळाली याच भूमिकेमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते.
  नटरंग, पारध, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा चित्रपटातून त्यांनी आपल्या सजग अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं, तुझ्या इश्काचा नाद खुळा, आई माझी काळूबाई, माझ्या नवऱ्याची बायको, सरस्वती अशा मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या