ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचं निधन

‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ अशा टीव्ही मालिका तसंच वस्त्रहरण, हसवाफसवी आदी 30 नाटकांमधून त्यांनी कामं केली होती.

  • Share this:

मुंबई, 2 जुलै : ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक लीलाधर कांबळी यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. ‘वस्त्रहरण’, 'हसवाफसवी',  ‘केला तुका नी झाला माका', 'वात्रट मेले'  यातल्या त्यांच्या भूमिका गाजलेल्या होत्या. गेली दोन वर्षं ते कॅन्सरशी लढा देत होते. रात्री 9 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.

'भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या टीव्ही मालिकांमधूनही त्यांनी काम केलं आणि नव्याने लोकप्रियता मिळवली होती.

दिलीप प्रभावळकर यांच्या हसवाफसवी या नाटकातली त्यांची भूमिका लक्षात राहणारी ठरली. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ते नोकरी करत असत. ही नोकरी सांभाळूनच त्यांनी नाटकं केली. 'काचेचा चंद्र'हिमालयाची सावली’, ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशा सुमारे 30 हून अधिक नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘वात्रट मेले’ नाटकातील ‘पेडणेकर मामा’, ‘केला तुका नी झाला माका’मधील ‘आप्पा मास्तर’, ‘वस्त्रहरण’ नाटकातील ‘जोशी मास्तर’ अशा त्यांच्या भूमिका गाजल्या.

First published: July 2, 2020, 10:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या