Home /News /entertainment /

VIDEO: या मराठी कलाकाराला वाटलं लॉकडाऊन संपला, घराबाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात...

VIDEO: या मराठी कलाकाराला वाटलं लॉकडाऊन संपला, घराबाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात...

लॉकडाऊन लवकर संपावा असं प्रत्येकाचं स्वप्न आहे. अभिनेता ललित प्रभाकरला सुद्धा असच काहीसं वाटतंय. यासंदर्भात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

  मुंबई, 29 एप्रिल : 25 मार्चपासून देशभरामध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि 3 मेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घरी राहायचं आहे. काहींना लॉकडाऊनचा कंटाळा आला आहे, तर काहीजण सुट्टी मिळाल्याने एन्जॉय करत आहेत. पण घराबाहेर पडता येत नाही याचं दु:ख सर्वांनाच आहे. कलाकारांचेही हाल असेच काहीसे आहेत. लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद आहेत, परिणामी एरवी 12-12 तास काम करणारे कलाकार देखील आज घरी आहेत. मात्र अशावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जोडले राहण्याचा प्रयत्न या कलाकारांकडून केला जात आहे. अशा वेळी काहींच्या सुपीक डोक्यातून भन्नाट कल्पना आल्याने काही क्रिएटीव्ह व्हिडीओ बनवले जात आहेत. (हे वाचा-29 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी केला होता 'सीता' दीपिका यांच्यासाठी प्रचार!) मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) याने देखील असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. जे आज प्रत्येकाला वाटतंय तेच चित्र ललितने त्याच्या व्हिडीओतून मांडलं आहे ते म्हणजे - 'लॉकडाऊन संपला!'  तुम्हाला देखील हा व्हिडीओ पाहून असं वाटेल की, 'हो हे तर माझ्याबरोबर पण झालं आहे.'
  लॉकडाऊन काळात सर्वच सेलिब्रिटी सोशल मीडियावर विशेष सक्रीय आहेत. ललित सुद्धा त्याच्या इन्स्टाग्रामवरून विविध पोस्ट करत असतो. आज चक्क त्याने लाकुड तोडताना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेली कॅप्शन सुद्धा कमाल आहे, 'काटे नहीं कटते ये दिन ये रात, तो सोचा क्यूँ न लकडी काट लू.'
  दरम्यान 3 मेपर्यंत लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपणार आहे. सध्या देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जीवनावश्यक सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता  कमी आहे. संपादन -जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या