अभिनेता ललित प्रभाकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सनी’ या चित्रपटाचं पोस्टर शेयर केलं आहे. पोस्टर शेयर करतात सर्वजण ललितला शुभेच्छा देत आहेत. या चित्रपटाच्या भेटीसाठी आपल्याला अजूनही थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण हा चित्रपट 2022मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी उन्हाळ्यात रिलीज होणार आहे. त्यामुळे आपल्याला ललितला नव्या रुपात भेटण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. (हे वाचा: HBD: न्यूड VIDEO ते सिक्रेट लग्न राधिका आपटे अडकली होती या विवादांमध्ये) ललितसोबत कोण अभिनेत्री असणार किंवा चित्रपटात अन्य कोणते कलाकार असणार याबद्दल अजूनही काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाहीय. मात्र ललितसाठी त्याचे चाहते खूपच खुश झाले आहेत. सध्या ललित भाडीपाची ‘शांतीत क्रांती’ या सिरींजमध्ये व्यग्र आहे. या सिरीजची बरीच चर्चासुद्धा सोशल मीडियावर सुरु आहे. तसेच ललित प्रभाकर ‘झोंबीवली’ या चित्रपटातदेखील दिसून येणार आहे. यामध्ये अमेय वाघ, वैदेही परशुरामी असे तगडे कलाकार असणार आहेत. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी असणार आहे. म्हणजेच हे ;लोक आपल्याला हसवत हसवत घाबरवण्यासाठी सज्ज आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment