Home /News /entertainment /

'सगळ्यांच्या आयुष्यातील तिच्यासाठी या चार ओळी' काय म्हणाला आहे कुशल बद्रिके?

'सगळ्यांच्या आयुष्यातील तिच्यासाठी या चार ओळी' काय म्हणाला आहे कुशल बद्रिके?

कुशल बद्रिकेने नुकतीच एक कविता पोस्ट केली आहे. त्याची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

  मुंबई, 15 जून- अभिनेता कुशल बद्रिकेचा (Kushal Badrike)सोशल मीडियावरचा वावर अलीकडच्या काळात वाढला आहे. त्याची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरत असते. कधी सिनेमाबद्दल तर कधी त्याच्या कामाबद्दल तो काही पोस्ट शेअर करत असतो. त्याची प्रेत्येक पोस्टही काहींना काही सांगण्याचा प्रयत्न करत असते. नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्य़ा कुशलची ही पोस्ट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. कुशलनं सुंदर असा फुलांचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देखील तितकीच सुंदर दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक “ती”असते. ह्या चार ओळी तिच्यासाठी……… ''ती रातराणीच्या परी दरवळे, उनाड वाऱ्यावरती. भर दिवसा मग मी रात बनुनी, घुटमळतो अवतीभवती..." सध्या कुशलनं शेअर केलेली ही कविता नेटकऱ्यांना मात्र भलतीच आवडलेली दिसत आहे. कुणी छान तर कुणी सुंदर म्हणत त्याच्या या कवितेचे वर्णन केलं आहे. काहींनी हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे.
  चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike) . विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. कुशल चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.तसेच कुशल सध्या चित्रपटांमध्येसुद्धा व्यग्र आहे. तो लवकरच 'जत्रा 2' मध्ये धम्माल करताना दिसणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या