मुंबई, 23 मार्च- सध्या एका मराठी अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. त्याची पोस्ट पाहून चाहत्यांना देखील चिंता वाटू लागली आहे. अनेकांनी त्याला तू चिंका करू नकोस असं म्हटलं आहे.
हा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके होय. कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. मागच्या काही दिवसात त्याचा सोशल मीडिया वावर वाढला आहे. त्याचं लिखाण पाहून देखील चाहते त्याचे कौतुक करताना दिसतात. कुशलनं नुकतीच एक पोस्ट केली आहे. त्याची पोस्ट काहीशी गंभीर आहे.
वाचा-सिद्धार्थ जाधवच्या 'त्या' कृतीने पाणावले अशोक मामांचे डोळे,इमोशनल VIDEO
कुशल बद्रिकनेनं म्हटलं आहे की, रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला, मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू…हळू ...रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर, आणि त्या उशीवरून ह्या उशीवर . “वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही. अशा वेळी मग आपण स्वतःला बदलायचं. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांने असंख्य कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
एका चाहत्यानं म्हटलं आहे की, दादा तुम्ही sirious बोलले तर तुमच्या आयुष्यात काही तरी sirious झाल अस वाटते... तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, मी तर हरपले केव्हाच लेखणीतही आणि ...💚😉❣️ असं काही संवेदनशील लिहितोस ना निशब्द व्हायला होते yaar ...मी तर हरपले केव्हाच लेखणीतही आणि ...💚😉❣️ असं काही संवेदनशील लिहितोस ना निशब्द व्हायला होते yaar ...अशा कमेंट चाहत्यांनी कुशलच्या या पोस्टवर केल्या आहेत.
कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. कुशल बद्रिके सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. ‘पांडू’,’जत्रा’, ‘स्लॅमबूक’, ‘डावपेच’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा अनेक चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.