मुंबई, 28 मे- मागच्या काही दिवसांपासून अभिनेता कुशल बद्रिके
(Kushal Badrike) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय झाला आहे. नेहमी आपल्या विनोदाने लोकांना पोटभरून हासायला लावणारा कुशल सोशल मीडियावर नेहमीच लक्षवेधी पोस्ट करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टमधून तो काहींना काही सांगण्याचा व मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कुशलनं नुकतची अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे
(pravin tarde) यांच्या अभिनयाने सजलेला 'हंबीरराव'
(hambirro) या सिनेमा विषयी एक पोस्ट केली आहे. सध्या कुशलची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
स्वराज्याचे धाकले धनी संभाजी राजे आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र अन पाठीवरची ढाल बनून राहणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्या शौर्याला सलाम करणारा 'हंबीरराव'
(hambirro) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कुशलने देखील हा सिनेमा पाहिला आहे. त्याने हा सिनेमा पाहिल्यानंतर एक पोस्ट केली आहे. त्यानं म्हटलं आहे की,“हंबीरराव” एक दैदीप्यमान सिनेमा.एखादं ऐतिहासिक पुस्तक वाचताना, आपल्या डोळ्यांसमोर काही चित्र उभी रहातात, काही प्रसंग तर चक्क दिसू लागतात, पण “हंबीरराव” हा सिनेमा आपल्याला इतिहासात घेऊन जातो, आपण आपलं अस्तित्व विसरून इतिहास जगू लागतो, त्या लढायांमध्ये एखादी तलवार हाती घेऊन आपणही “स्वराज्याच्या पायरीला” शत्रूचा रक्ताने आणि आपल्या प्राणाने अभिषेक घालावा असं वाटत राहतं.''
वाचा-
दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक, वर्षभरापूर्वीच झाले होते वडिलांचे निधन
''प्रवीण तरडे मित्रा ह्या सिनेमासाठी मी तुझा आणि तुझ्या निर्मात्यांचा, कायम ऋणी राहीन.“इतिहास आपल्याला जगायला शिकवतो”, आपल्या मुलांना जर कसं जगायचं ? हे शिकवायचं असेल तर त्यांना सर सेनापती “हंबिरराव” नक्की दाखवा !!''
‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike) . विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.