मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कुशल बद्रिकेची ती पोस्ट वाचून चाहता म्हणाला, 'आई गं काय लिहिलंय हे..'

कुशल बद्रिकेची ती पोस्ट वाचून चाहता म्हणाला, 'आई गं काय लिहिलंय हे..'

Kushal Badrike

Kushal Badrike

कुशल बद्रिकेने एक पोस्ट केली आहे, सोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंपेक्षा त्याच्या फोटो कॅप्शनची जास्ता चर्चा रंगली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 मार्च- चला हवा येऊ द्या फेम अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. कुशलची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट ही चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. चाहत्यांसोबत तो त्याचे भन्नाट व्हिडिओ शिवाय काही फोटो देखील शेअर करत असतो. याशिवाय मागच्या काही दिवसात त्याचं सोशल मीडियावरचं जे लिखान आहे, त्यामुळं देखील त्याची चर्चा होती. त्यानं आता एक पोस्ट केली आहे, सोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंपेक्षा त्याच्या फोटो कॅप्शनची जास्ता चर्चा रंगली आहे.

कुशल बद्रिके सध्या मस्त समुद्र किनारी चिल करताना दिसत आहे. चिल करत असतानाच त्याने दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कुशलनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, समुद्रातून उसळून आलेल्या प्रत्येक लाटेला,परतणारी एक लाट अडवते .मग ऐकू येते समुद्राची गाज, फेसाळत्या किनाऱ्याचा आवाज,अविरत…… कधीही न संपणारं…रात्रभर भावनांचा असाच एक समुद्र कधीकधी मनात थैमान घालत रहातो , ज्याच्या किनाऱ्या वरून कुणी साधं फिरकत सुद्धा नाही - सुकून..त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी त्याच्या फोटो कॅप्शनचं कौतुक केलं आहे.

वाचा-कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर! सगळ्यांसमोर केली मोठी घोषणा

एका चाहत्यानं म्हटलं आहे की, मराठी कलाकारांची captions जाम कमाल असतात राव कसं सुचत यार तुम्हा लोकांना हे ... तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,काय अप्रतिम विचार केलाय आणि उतरवलय.. तर आणखी एका चाहत्यानं म्हटलं आहे की, आई गं काय लिहिलंय हे ❤️..अशा असंख्य कमेंट कुशलच्या या पोस्टवर आल्या आहेत.

कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले होते. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.कुशल बद्रिके सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. ‘पांडू’,’जत्रा’, ‘स्लॅमबूक’, ‘डावपेच’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा अनेक चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशा काळात कुशल देखील सुट्टयांचा आनंद घेत आहे. त्याने काही समुद्र किनाऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. अनेकांनी त्याचे फोटो पाहून ठिकाण ओळखलं आहे. तो सध्या गोव्यात आहे आणि तिथल्या एका रिसॉर्टमधले फोटो शेअर केले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment