मुंबई, 25 मार्च- कधी कुणाचं नशीब बदलेलं सांगता येत नाही. कुशल बद्रिकेनं देखील नशीब आणि भविष्य याबद्दलचा एक किस्सा नुकताच सोशल मीडियाव शेअर केला आहे. कुशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सातत्याने तो काहीनं काही पोस्ट करताना दिसतो. त्याचं सोशल मीडियावरचं लिखाणं अनेकांच्या आवडीचा विषय बनला आहे. त्याची प्रत्येक पोस्ट काहींना काही सांगत असते. आपल्या परस्थितीच दाखला देताना दिसते. म्हणून तर अनेकजण त्याची पोस्ट वाचून त्याच्या परस्थितीला रिलेट करताना दिसतात. सध्या देखील त्यानं अशीच एक पोस्ट केली आहे, जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
कुशल बद्रिके लंडनला म्हणजे परदेश दौऱ्यासाठी निघाला आहे. त्यानं त्याचा छान फोटो पोस्ट केला आहे. सोबत कुशलनं म्हटलं आहे की, मी लहान असताना माझ्या वडिलांना पान खायची भारी हौस होती. 120/300 कत्री सुपारी पंढरपुरी तंबाखू मारके. आणि त्या पानाचे पैसे, मला माझ्या हातून द्यायची भारी हौस.लहानपणी एकदा, असंच पप्पांच्या पानाचे पैसे “मी” देत असताना त्या चौहान नावाच्या पानवाल्याने माझा हात पाहिला आणि म्हणाला…..“साब ये लडका बडा होके कुछ बनेगा, देखो ये ना… देस बिदेस घुमेगा ! “लहानपणी, कन्नी कापलेल्या पतंगा मागे “उरफाटेस्तोवर” धावणाऱ्या मला, माझ्या आई-वडिलांनी कधी स्वप्नांच्यामागे “उरफाटेस्तोवर” धावायला लावलं नाही, आणि झाडाला “व्हलटा” (छोटी काठी) मारून हवी असलेली “कैरी” पदरात पाडून घेणाऱ्या माझ्यातही, हवी असलेली “स्वप्न“ पदरात पाडून घेण्याचं स्किल कधी आलं नाही.
वाचा-सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणारा अटकेत; कोल्हापूरातून जप्त केले 70 लाख
जे जसं होत गेलं, तसा मी घडत गेलो, घरातून “प्रामाणिकपणाची शिदोरी” तेवढी मिळाली होती ती मात्र ह्या प्रवासात कामी आली. आणि अजूनही येते.माझ्या आई-बाबांनी, अवास्तव स्वप्न पाहून स्वतःच्या पापण्या कधी जड करुन घेतल्या नाहीत, की अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून, माझ्या आयुष्याला कुबड आणलं नाही, म्हणून मी आता पानवाल्या चौहान साबचं बोलणं खरं करायला निघालोय.आज पुन्हा मी लंडन च्या प्रवासाला निघालोय…..नशीबाच्या पानावर माझ्यासाठी काय लिहून ठेवलय मला माहित नाही, पण त्यादिवशी चौहान साबने पप्पांच्या १२०/३०० पानावर माझा हा लंडन दौरा लिहिला असेल हे नक्की.
कुशल बद्रिकेनं नुकतीच एक भावुक पोस्ट केली होती. त्यानं म्हटलं होतं की, कुशल बद्रिकनेनं म्हटलं आहे की, रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला, मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू…हळू ...रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर, आणि त्या उशीवरून ह्या उशीवर . “वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही. अशा वेळी मग आपण स्वतःला बदलायचं. त्याच्या या भावुक पोस्टवर चाहत्यांनी देखील असंख्य कमेंट केल्या होत्या.
View this post on Instagram
त्यानंतर आज देखील त्यांना त्याच्या बलपणीची आठवण आणि परदेश दौरा याबद्दल एक भावुक पोस्ट केली आहे. आयुष्यात खूप अडचणींना तोंड दिल्यानंतर कुशल एक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. आज त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. पण अभिनेता बनण्याचा त्याचा प्रवास नकीच सोपा नव्हता. कोणाचाही पाठींबा नसताना केवळ अभिनयाच्या जीवावर त्यानं त्याची वेगळी ओळख बनवली आहे. म्हणून तर सर्वसामान्य घरातून आलेला कुशल आज परदेश वारी करताना त्याचे जुने दिवस आठवून भावुक होताना दिसतो. खरचं त्याचा अभिनयाचा प्रवास कौतुकास्पद असाच आहे.
कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. कुशल बद्रिके सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. ‘पांडू’,’जत्रा’, ‘स्लॅमबूक’, ‘डावपेच’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा अनेक चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.