Home /News /entertainment /

कोण खोटं आणि कोण खरं हे लोकांना बरोबर कळतं...., समीर वानखेडेंसाठी क्रांती रेडकरची पोस्ट

कोण खोटं आणि कोण खरं हे लोकांना बरोबर कळतं...., समीर वानखेडेंसाठी क्रांती रेडकरची पोस्ट

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले. आज समीर वानखेडे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त क्रांतीने मीडियावर फोटो शेअर खास पोस्ट लिहिली आहे.

  मुंबई, 14 डिसेंबर : शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर यांच्यावर अनेक आरोप केले. यावेळी एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर(Kranti Redkar) त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. आज समीर वानखेडे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त  क्रांतीने मीडियावर फोटो शेअर खास पोस्ट लिहिली आहे. क्रांतीने इन्स्टावर समीर वानखेडे यांच्यासोबत एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, समीर वानखेडे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्याबद्दल, तुझ्या धडाडी आणि कामाबद्दल मी आजपर्यंत खूप काही लिहिले आहे. पण आज मला तुझ्याबद्दल लिहिण्यास शब्द कमी पडत आहेत. देशातील अमली पदार्थांशी निगडीत दुष्टांशी लढा देणं ही एक गोष्ट तर आहे, परंतु तुमच्या या मोहिमेत तुम्हाला रोखणाऱ्या सर्वांविरुद्ध लढा देणं हा एक मोठा संघर्ष आहे. तू या सर्वांना मात देत आहेस. तू खूप चांगले काम करत आहेस. समाजातील घाण स्वच्छ करून तरूणाईला योग्य मार्ग दाखवत आहेत, त्यांच्या भल्यासाठी काम करत आहेस. (आता कदाचित त्यांना हे कळणार नाही) तुझ्यासोबत जनतेचा आशीर्वाद आहे. कारण सामान्य माणूस मुळातच हुशार आहे. कोण खोटं आणि कोण खरं हे लोकांना बरोबर कळतं. तू फक्त तुझं काम करत राहा. जे लोक खरोखर आपल्या राष्ट्रावर प्रेम करतात आणि तुझ्यावर प्रेम करतात तेच लोक महत्त्वाचे आहेत. क्रांतीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. वाचा: सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून या अभिनेत्रीची एक्झिट, कारण आलं समोर मधल्या काळात समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप झाले. यावर त्यांची पत्नी क्रांती रेडकर हिनं पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा दिला. क्रांती रेडकर ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिचे विविध फोटो तसेच काही फनी व्हिडिओ देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
  असं झालं क्रांतीच लग्न पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेल्या समीर वानखेडे यांच्याशी 2017 साली क्रांतीनं लग्न केलं. गुपचूप लग्न करुन त्यावेळी तिने मराठी सिनेसृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला होता. क्रांतीच्या जवळच्या मैत्रिणी आणि काही नातेवाईकांच्या उपस्थितीत क्रांती आणि समीर यांनी शुभमंगल केले होते. समीर आणि आपण लग्नाआधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे क्रांतीनं त्यावेळी म्हटलं होतं. आपल्याला समजून घेणारा साथीदार मिळाला. मी लग्नानंतरही सिनेसृष्टीत काम करत राहीन, असेही तिने म्हटले होते. कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालायला लागली…या गाण्यावर क्रांती रेडकरनं अनेकांना थिरकायला लावले होते. तिने लग्नानंतर क्रांती रेडकर वानखेडे असे नाव लावले. समीर आणि क्रांती यांना दोन जु्ळ्या मुली आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या