Home /News /entertainment /

‘माजी खासदार आणि नागरिकांचा माझ्या लढ्याला पाठिंबा’ किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत

‘माजी खासदार आणि नागरिकांचा माझ्या लढ्याला पाठिंबा’ किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत

अभिनेते किरण माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट माजी खासदार निवेदिता माने यांच्याबाबतीत आहे.

  मुंबई, 25 फेब्रुवारी-   गेल्या महिन्यात अभिनेते किरण माने   (Kiran Mane)  प्रचंड चर्चेत आले होते. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) मालिकेतून काढून टाकलं असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ माजली होती.सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यांनतर किरण माने सतत सोशल मीडियावर आपली बाजू मांडत असतात.दरम्यान किरण मानेंच्या एका इन्स्टा पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहूया काय आहे ही नेमकी पोस्ट. अभिनेते किरण माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट माजी खासदार निवेदिता माने यांच्याबाबतीत आहे. किरण माने यांनी निवेदिता माने यांच्यासोबतच एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांनी पोस्ट करत लिहिलं आहे, ''"किरणजी, आठवड्यापूर्वी पट्टणकोडोलीला एका कार्यक्रमाला गेले होते. बचत गटाच्या दोन हजार महिला तुमच्यासाठी हळहळताना पाहिल्या... मला सांगत होत्या किरण मानेंवर अन्याय झालाय, प्लीज त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी करा. मराठी कलाकारासाठी एवढं प्रेम मी याआधी पाहिलं नव्हतं. तुम्हीच जिंकणार." इचलकरंजीमधून सलग दोन टर्म खासदार झालेल्या मा. निवेदिता माने मॅडम मला सांगत होत्या. हल्ली त्यांचा मुलगा धैर्यशील खासदार आहे....सांगलीजवळील उदगांवमधील नागरीकांनी त्यांच्या हस्ते माझ्या लढ्याला सन्मानित केलं आज. उद्या बोलू त्याविषयी".या पोस्टमुळे किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

  स्टार प्रवाह वाहिनीवर 'मुलगी झाली हो' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेते किरण माने महत्वाची भूमिका साकारत होते. या मालिकेत ते विलास पाटीलच्या भूमिकेत दिसत होते. यांनी मुख्य पात्र असणाऱ्या साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. प्रेक्षक त्यांना पसंत करत होते. त्यांच्या दमदार अभिनयाचं सतत कौतुकही होत असे. परंतु त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यांनतर मालिकेचा नवीन पोस्टर समोर आला होता. या पोस्टरमध्ये फक्त साजिरी आणि शौनक दिसून आले होते. या पोस्टरमधून किरण माने यांना वगळण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यांनतर हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं होतं. (हे वाचा:हृता दुर्गुळेच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण! अभिनेत्रीची रोमँटिक पोस्ट चर्चेत ) त्यांनतर स्टार प्रवाह वाहिनीने एक नोटीस जारी करत, किरण माने यांची सेटवरील वर्तवणूक चांगली नसल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांना वारंवार सांगून त्यांनी बदल न केल्याने त्यांना मालिकेतून टाकण्यात आल्याचं वाहिनीने सांगितलं होतं. परंतु हा माझ्याविरोधात कट रचल्याचं किरण मानेंचं प्रत्युत्तर होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Tv shows

  पुढील बातम्या