Home /News /entertainment /

Kiran Mane प्रकरणात राजकारण तापलं! चित्रा वाघ यांच्यानंतर रुपाली चाकणकर यांची उडी

Kiran Mane प्रकरणात राजकारण तापलं! चित्रा वाघ यांच्यानंतर रुपाली चाकणकर यांची उडी

मागच्या काही दिवसांपासून किरण माने (kiran mane) यांचे नाव चर्चेत आहे. राजकीय भूमिका मांडल्यानं त्यांना मालिकेतून काढल्याचा आरोप करण्यात येत होता. आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लक्ष घालत थेट मालिकेच्या निर्मात्याकडे लेखी स्पष्टीकरण मागितलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 जानेवारी- मागच्या काही दिवसांपासून किरण माने  (kiran mane) यांचे नाव चर्चेत आहे. राजकीय भूमिका मांडल्यानं त्यांना मालिकेतून काढल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र महिला कलाकारांसोबत गैरवर्तणूक केल्यानं त्यांना 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतून डच्चू देण्यात आल्याचं स्टार प्रवाह वाहिनीनं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता राज्यातील अनेक नेते तसेच कलाकारांनी याप्रकरणी  आपली भूमिका मांडली आहे. काहींनी किरण माने यांना या प्रकरणात पाठींबा दिला (kiran mane  controvercy )आहे तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission president Rupali Chakankar) यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले आहे. रुपाली चाकणकरांनी मुलगी झाली हो मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहून किरण माने यांना मालिकेतून का काढलं, याचा जाब विचारल आहे. रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, स्टार प्रवाह या वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता विविध माध्यमांवर आपल्या वैचारिक भूमिका मांडतात या कारणामुळे या मालिकेतून काढून टाकलं असून मालिका निर्मात्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. यासोबत त्यांनी एक पत्र देखील जोडले आहे. रूपाली चाकणकर यांनी पॅनोरामा इंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझाना घई यांना एक पत्र लिहित घडलेल्या प्रकरणाचे स्पष्टीकरण मागितलं आहे. या पत्रात किरण माने यांच्या पत्नी ललिता किरण माने यांच्या तक्रारीचा देखील उल्लेख केला आहे. पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, ‘किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांनी आपल्याला या सगळ्या प्रकाराचा मानसिक त्रास तसेच आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटलं आहे. किरण माने यांना कोणतेही पूर्व कल्पना न देता मालिकेतून काढल्याने देखील किरण माने यांच्या पत्नी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या सगळ्या घडलेल्या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. रूपाली चाकणकर यांनी निर्मिती संस्थेला पत्र लिहित या प्रकराणाबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतीतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना या पत्राचया माध्यमातून देण्यात आलेले आहेत. वाचा-कोण आहेत मानेचे बोलवते धनी ?? Kiran Mane च्या वादात आता चित्रा वाघ यांची उडी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणारून किरण माने यांना महिलांशी चुकीचे वागल्याबद्दल शिक्षा करण्याची मागणी केली आहे. त्यांची पोस्ट चर्चेत असतानाच आता या प्रकरणात रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात  एंट्री केली आहे. त्यांनी थेट निर्मात्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. वाचा-Kiran Mane प्रकरणी जातीयवाद आणणाऱ्यांना अनिता दातेने दिलं सडेतोड उत्तर किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर सोशल मिडीयावर बरीच चर्चा झाली. शरद पवारांची किरण मानेंनी भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीच्या स्पष्टीकरणानंतर सह कलाकारांना विचारलं असता त्यांनी किरण मानेंवरच गंभीर आरोप केलेत. मालिकेतील मुख्य कलाकार दिव्या पुगावकरनं किरण मानेंवर आरोप करताना माने हे सतत टोमणे मारायचे आणि अपशब्द माझ्याशी बोलले, असा आरोप केला. तर किरण माने सेटवर चांगले वागत नसत, असं काही सहकलाकारांचं म्हणणं आहे. तर काही सहकलाकारांनी प्रतिक्रिया देत किरण मानेंना पाठिंबा दिला आहे. किरण माने हे एक चांगली व्यक्ती आहेत. त्यांनी आमच्यापैकी कुणाशीही गैरवर्तन केलेलं नाही.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

    पुढील बातम्या