Home /News /entertainment /

VIDEO: मराठी अभिनेता आपल्या लेकीसाठी शोधतोय नाव, पाहा तुम्हाला काही सुचतंय का?

VIDEO: मराठी अभिनेता आपल्या लेकीसाठी शोधतोय नाव, पाहा तुम्हाला काही सुचतंय का?

वर्षभरात मनोरंजन सृष्टीत अनेक गोड बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या. गेल्या काही महिन्यात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर असे अनेक कलाकार आहेत जे पहिल्यांदाच आईबाबा बनले आहेत. आईबाबाच्या यादीत समाविष्ट झालेल्या मराठी सेलिब्रेटी कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे ( Minakshi Rathod & Kailash Waghmare). या जोडप्याने काही दिवसांपूर्वीच लेकीचं स्वागत केलं आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 27 मे-   वर्षभरात मनोरंजन सृष्टीत अनेक गोड बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या. गेल्या काही महिन्यात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर असे अनेक कलाकार आहेत जे पहिल्यांदाच आईबाबा बनले आहेत. आईबाबाच्या यादीत समाविष्ट झालेल्या मराठी सेलिब्रेटी कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि अभिनेता कैलास वाघमारे ( Minakshi Rathod & Kailash Waghmare). या जोडप्याने काही दिवसांपूर्वीच लेकीचं स्वागत केलं आहे. त्यांनतर आता अभिनेत्याने पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबतचा (Baby Girl)  एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. कैलास आणि मीनाक्षी हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांना देत असतात. अशातच आता अभिनेत्याने पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबतचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी अभिनेत्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे. यामध्ये कैलास आपल्या मुलीला आपल्या हातात घेऊन खेळविताना दिसत आहे. त्यांची मुलगी अवघ्या 17-18  दिवसांची आहे. विशेष म्हणजे अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत आपल्या लेकीसाठी एक गोड नाव सुचविण्याची विनंती चाहत्यांना केली आहे.
  अभिनेत्री मीनाक्षी राठोडने सोशल मीडियावरुन आपण आई होणार असल्याची माहिती दिली होती. सोशल मीडियावर तिनं तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर अप्रतिम प्रेग्नेन्सी ग्लो आला होता. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये तिने हे फोटो शेअर केले होते. अभिनेत्रीनेफुलांनी सजलेल्या झोपळ्यावर बसून हे फोटो काढले होते. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.त्यांनतर 11 मे रोजी मीनाक्षीने एका गोंडस लेकीला जन्म दिला होता. (हे वाचा:VIDEO: 'जगातली सगळ्यात प्रगत'; सिद्धार्थ चांदेकरची 'ती' पोस्ट होतेय VIRAL ) स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखानींही लोकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. याच मालिकेतील देवकी ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड तिच्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली होती. तर दुसरीकडे कैलास वाघमारेने तान्हाजी: द अनसंग वारिअर, हाफ तिकीट, ड्राय डे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या