मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘गोदावरी’ या सिनेमाच्या नावाबाबत जितेंद्र जोशीने सांगितली ही खास गोष्ट

‘गोदावरी’ या सिनेमाच्या नावाबाबत जितेंद्र जोशीने सांगितली ही खास गोष्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तसेच त्याने गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तसेच त्याने गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तसेच त्याने गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मुंबई, 14 ऑक्टोबर: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तसेच त्याने गोदावरी चित्रपटातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. आता जितेंद्र जोशी (jitendra joshi) निर्मित गोदावरी (Godavari) या मल्टिस्टारर सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाबद्दल जितेंद्र जोशीने एक खास पोस्ट शेअर करत खास माहिती दिली आहे. या सिनेमाचे गोदावरी नाव ठेवण्याचे काय कारण आहे हे जितेंद्रने या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

जितेंद्र जोशीने त्याचा गोदावरीच्या गाठावरचा एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, 50 दिवस बाकी..त्या दिवशी नाव ठरलं चित्रपटाचं !!कथेचं बीज होतं फक्त निखिल च्या मनात आणि माझ्या डोक्यात का कुणास ठावूक नाशिक!!23 ऑगस्ट ला नाशकात दिवसभर फिरल्यानंतर रात्री निखिल म्हणाला चित्रपटाचं नाव" गोदावरी" !!! मी साशंक होतो परंतु का कुणास ठावूक आश्र्वस्त देखील. दुसऱ्या दिवशी सुद्धा प्राजक्त देशमुख नाशिक फिरवत होता . सोबत राहून वेगळं नाशिक ऐकवत / दाखवत हो

24 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी नाशिक मध्ये गोदावरी च्या तीरावर काढलेला हा फोटो. . चित्रपट बनवण्या आधी लोकांच्या आणि नाशिकच्या अंतरंगात डोकावून बघत होतो. गोदावरी ला श्रद्धेने नमस्कार करून मनापासून प्रार्थना केली की हा सिनेमा तुझ्या काठावर येऊन करतो आहे. संपूर्ण जबाबदारी तू घे आणि सांभाळ आम्हा सर्वांना. असंख्य अडचणी असंख्य गोष्टी पार पाडत गोदावरी चं चित्रण निखिल आणि टीम ने यशस्वीरीत्या पार पाडलं.

आज च्या घडीला 2 मानाच्या आतंरराष्ट्रीय महोत्सवात निवड होऊन तिथल्या वेगवेगळ्या प्रेक्षकांची पसंती मिळवून बरोब्बर 50 दिवसानंतर 3 डिसेंबर रोजी आपला गोदावरी चित्रपट तुम्हा सर्वांच्या भेटीला येतोय. मी निश्चिंत आहे. कारण जबाबदारी गोदामाई ने घेतली आहे; त्याच दिवशी!!!

वाचा :अनुष्का-विराटच्या लेकीला पाहिले का ? ; अष्टमीच्या शुभेच्छा देत केला लेकीचा फोटो शेअर

काही दिवसापूर्वी जितेंद्र जोशीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर गोदावरी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत  लिहिले होते  की, आम्ही ठरवलं होतं एक कागदाची होडी करु आणि सोडू नदीत. जिथे जिथे पोहोचेल तिथून हाक येईल. पाहू कुठं कुठं पोहचते. पहिली हाक आलीय….व्हॅन्कुवर (कॅनडा) इथून. गोदावरी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकणार ‘व्हॅन्कुवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल’ मध्ये. गोदावरीचा वर्ल्ड प्रिमिअर !नदीत सोडलेली आठवण जितकी गहिरी … तितके नदीचे तरंग दूरवर पसरतात. पहिलाच तरंग कॅनडापर्यंत गेलाय. गोदावरी उगमाचे साक्षीदार व्हा ! आशिर्वाद असू द्या.

वाचा : साडी नेसून बिनधास्त डान्स? बडी मुशकिल बाबा... असं वाटत असेल तर अमृता-सोनालीचा हा VIDEO पाहाच

गोदावरी चित्रपटात नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या एका कुटुंबाच्या आणि त्या नदीच्या जिव्हाळ्याची गोष्ट रेखाटण्यात आली आहे. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स यांनी गोदावरीची निर्मिती केली आहे. पवन मालू, मिताली जोशी हे चित्रपटाचे निर्माते आहेत तर आकाश पेंढारकर, पराग मेहता हे सहनिर्माते आहेत.या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment