• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'हा' मराठमोळा अभिनेता म्हणतोय... PM, CM नंतर; पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टरचा मिळू दे बाबा!

'हा' मराठमोळा अभिनेता म्हणतोय... PM, CM नंतर; पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टरचा मिळू दे बाबा!

'रस्ते बनवण्यात जी हातसफाई त्यांना जमते ना, कमाल! त्यांना कोणी बदलू शकत नाही!ते भारी आहेत! सगळ्यांना रस्त्याला लावतात!' खड्ड्यांना वैतागून अभिनेत्याने केलेली पोस्ट viral

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर 2021 ; आपण दररोज टीव्हीवर, सोशल मीडियावर तसेच वर्तमानपत्रात अपघताच्या बातम्या वाचत, पाहत असतो. पावसाळा आला की खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात. अशावेळी पत्येक जण याचे खापर प्रशासनावर फोडत असते. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने या खड्डयांसीठी, रस्त्यांची झालेली दुरवस्था यासाठी कॅान्ट्रॅक्टर लोकांना दोषी ठरवले आहे. अभिनेता हेमंत ढोमेने  (Hemant Dhome) खड्ड्यांसाठी थेट कॅान्ट्रॅक्टर लोकांवर निशाणा साधत पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टर चा मिळुदे बाबा...  (Road Contractor) असं म्हटलं आहे. हेमंत ढोमेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून , रस्त्यांची दूरवस्था झालेला एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, रस्त्यावर असलेल्या खड्यांचा फोटो शेअर करत ‘अतिशय प्रामाणिकपणे सांगतो… पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक सग्गळे नंतर! खरे ‘कॅान्ट्रॅक्टर’! रस्ते बनवण्यात जी हातसफाई त्यांना जमते ना, कमाल! त्यांना कोणी बदलू शकत नाही!ते भारी आहेत! सगळ्यांना रस्त्याला लावतात! पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टर चा मिळुदे बाबा!’, अशा शब्दात त्याने ट्वीट केले आहे. वाचा : Indian Idol 12: मराठमोळ्या सायली कांबळेने खुल्लमखुल्ला दिली प्रेमाची कबुली; निहाल नव्हे तर हा आहे तो लकी मॅन हेमंतच्या या ट्वीटवर सर्वसामान्य नागरिकांनी तसेच काही कलाकार मंडळीनी देखी फोटो, व्हिडिओ शेअर करत त्यांच्या शहरातील सत्यस्थिती दाखवली आहे. दिग्दर्शक समीर विद्वांसने हेमंतच्या ट्वीटवर रिप्लाय देत रिक्षातून जातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि ‘हॅ!! हे तर काहीच नाही..’, असे कॅप्शन दिले आहे. तर यावर हेमंतने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘रस्तांबद्दल बोलतोय आपण तुम्ही प्लीज बोटीत बसुन पवई तलावाचे व्हिडियो टाकु नका प्लीज! विनंती आहे…’,असे हेमंत म्हणाला. मुंबई असो किंवा आणि कोणतेही शहर पावासाळ्या सर्वांना या खड्ड्यांमधूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अनेक नागरिक यासाठी अंदोलन करत असतात. मात्र प्रत्येक वर्षी तीच स्थिती दिसत असते. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी अपघतात जवळच्या व्यक्तींना गमावले देखील आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: