Home /News /entertainment /

अभिनेता हेमंत ढोमेच्या 'त्या' एका ट्वीटमुळे सुटली सर्वांची समस्या

अभिनेता हेमंत ढोमेच्या 'त्या' एका ट्वीटमुळे सुटली सर्वांची समस्या

हेमंत ढोमेच्या एका ट्वीटमुळं सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. सध्या त्याचं हे ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे.

    मुंबई, 16 मे- अभिनेता दिग्दर्शक निर्माता हेमंत ढोमे  (hemant dhome ) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. विविध विषयावर असेल किंवा काही समाजातील समस्या यावर तो मत मांडताना दिसतो. त्याच्या एका ट्वीटमुळं सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. सध्या त्याचं हे ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे. हेमंत ढोमे हा गोरेगावमधील ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीत पाण्याची मोठी समस्या होती. सेलिब्रिटी जरा असला तरी यांना देखील समस्या असतात. मग त्यानं यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यानं पाणी टंचाईबाबत एक ट्वीट केलं. ते ट्वीट इतकं चर्चेत आलं की त्याच्या बिल्डिंगमधली पाण्याची समस्या मुंबई महापालिकेला एका दिवसात निकाली लावणं भाग पडलं. वाचा-अनिरुद्धचा अरुंधतीला महत्त्वाचा सल्ला, एका निर्णयामुळं बदलणार अरुंधतीचं आयुष्य? हेमंत ढोमे याचे काय आहे ते ट्वीट? हेमंत ढोमेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आमच्या गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झाली आहे, OC आहे, आम्ही Property Tax भरला आहे… पाणी आमचा हक्क आहे, ‘सर्वांसाठी पाणी’ या योजनेचा आम्हाला फायदा होईल ही अपेक्षा! आम्हाला पाणी मिळावे ही कळकळीची विनंती.. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये हेमंतने म्हटलं आहे की, बिल्डर आणि महानगरपालिकेच्या वादात प्रामाणिक पणे सर्व नियम पाळणारे, टॅक्स भरणारे सामान्य नागरिक भरडले जात आहेत… तातडीने लक्ष द्यावे ही कळकळची विनंती! हेमंतने हे ट्वीट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना टॅग केली. हेमंत ढोमेच्या या पोस्टने प्रशासनाची झोप उडाली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या बिल्डिंगमधल्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला. यानंतर हेमंतने आभाराचीही पोस्ट केली आहे. त्याने म्हटलं आहे की, आज आम्हा रहिवाशांचे एक स्वप्नं तुम्ही पूर्ण केलंत! आम्हाला आमच्या हक्काचं पाणी दिलंत… यापुढेही आपले असेच सहकार्य मिळेल हिच अपेक्षा! खूप खूप धन्यवाद! हेमंतच्या या सोशल मीडियाच्या उपयुक्त वापराचं कौतुक होत आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या