Home /News /entertainment /

अभिनेता गश्मिर महाजनीच्या मुलाच क्यूट व्हिडिओ पाहून म्हणाल, 'बिलकुल अपने बाप पे गया है'

अभिनेता गश्मिर महाजनीच्या मुलाच क्यूट व्हिडिओ पाहून म्हणाल, 'बिलकुल अपने बाप पे गया है'

गश्मिर महाजनीनं नुकताच त्यानं त्याच्या मुलासोबतचा क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    मुंबई, 14 मे- मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता म्हणून गश्मिर महाजनी (Gashmeer Mahajani) ओळखला जातो. आपल्या अभिनयाने मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा काही मालिकांकडेही वळवला. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे. याच कारणामुळे त्याचा प्रत्येक चाहता त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. गश्मिर महाजनी त्याच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय त्याच्या मुलासबोतचे (Gashmeer Mahajani Son) काही व्हिडिओ, फोटो देखील तो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच त्यानं त्याच्या मुलासोबतचा क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गश्मिर महाजनीनं ट्वीटरव त्याच्या मुलाचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानं व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, बिलकुल अपने बाप पे गया है … हे जोक करत आहेत...पण मी खडूस नाही..(They are joking by the way, main Khadoos nahi hoon )..अशी कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिली आहे. ही कॅप्शन देण्यामागं देकील एक कारण आहे. वाचा-'विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या पोस्टवर निषेध व्यक्त व्हिडिओच्या सुरूवातील गश्मिर त्याच्या मुलाला डान्स करणार का असो विचारतो..त्यानंतर लगेच तिथं एक महिला येते जी गश्मिरच्या मुलास ड़ान्स करण्यास विचारते तर तो नाही म्हणतो..तर ती लगेच म्हणतो खडूस..बिलकुल अपने बाप पे गया है..बिलकुलच फ्रेंडली नाही.. यावर गश्मिर लगेच म्हणतो की. अरे तो तसा नाही... तो खूप फ्रेंडली आहे.. पण ती महिला लगेच म्हणते की, नाही तुझ्या बायकोनचं सांगितलं आहे तो तुझ्यासारखा खडूस आहे ते.. असं तू देखील म्हणतोस.. असा काहीसा हा व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेते रविंद्र महाजनी यांचा गश्मिर मुलगा आहे. त्याने 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या मराठी आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. .
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या