मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Mazi Tuzi Reshimgath मालिकेतील हा कलाकार आहे बेस्टचा कर्मचारी

Mazi Tuzi Reshimgath मालिकेतील हा कलाकार आहे बेस्टचा कर्मचारी

माझी तुझी रेशीमगाठ (mazi tuzi reshimgath) मालिकेतील घारतोंडे सिम्मीच्या चुकांवर पांघरून घालताना दिसतो आणि तिची मदत करताना देखील दिसतो. घारतोंडेची भूमिका साकारणाऱे अभिनेते दिनेश कानडे (Dinesh Kanade) यांच्याविषयी जाणून घेणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ (mazi tuzi reshimgath) मालिकेतील घारतोंडे सिम्मीच्या चुकांवर पांघरून घालताना दिसतो आणि तिची मदत करताना देखील दिसतो. घारतोंडेची भूमिका साकारणाऱे अभिनेते दिनेश कानडे (Dinesh Kanade) यांच्याविषयी जाणून घेणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ (mazi tuzi reshimgath) मालिकेतील घारतोंडे सिम्मीच्या चुकांवर पांघरून घालताना दिसतो आणि तिची मदत करताना देखील दिसतो. घारतोंडेची भूमिका साकारणाऱे अभिनेते दिनेश कानडे (Dinesh Kanade) यांच्याविषयी जाणून घेणार आहे.

मुंबई, 28 ऑक्टोबर : झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (mazi tuzi reshimgath) ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांच्यात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका सुरेख निभावल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत सिम्मी चौधरी ही भूमिका विरोधी दर्शवली आहे. तिच्या या कंपनीच्या कामात तिला अफरातफरीत घारतोंडेची उत्तम साथ मिळताना दिसते. वेळोवेळी हा घारतोंडे सिम्मीच्या चुकांवर पांघरून घालताना दिसतो आणि तिची मदत करताना देखील दिसतो. घारतोंडेची भूमिका साकारणाऱे अभिनेते दिनेश कानडे (Dinesh Kanade) यांच्याविषयी जाणून घेणार आहे.

अभिनेते दिनेश कानडे यांनी उत्कर्ष मंदिर मालाड येथील शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पुढचं शिक्षण पूर्ण केले आहे. आजवर त्यांनी हिंदी मराठी अशा नाटकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. रंगकर्मी या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. चाणक्य या नाटकातही ते महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. चाणक्य हे हिंदी नाटक दिल्लीतील संसद भवनात देखील सादर करण्यात आले होते.

दिनेश कानडे

दिनेश कानडे

सध्या दिनेश कानडी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतही घारतोंडेची भूमिका साकारताना दिसत आहे. या भूमिकेला ते उत्तम न्याय देताना दिसत आहे. भूमिका जरी नकारत्मक असली तरी त्यांच्या अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्यामध्ये ते लोकप्रिया झालं आहेत.

वाचा : Aryan Khanसोबत जामीन मिळालेली मुनमुन धमेचा आहे तरी कोण ?

यासोबतच साईबाबांच्या जीवनावर आधारीत मालिकेत आणि स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे विशष कौतुक झाले. या भूमिकेमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी राहुजी सोमनाथ ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेमुळे दिनेश कानडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले.

वाचा : मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई करतोय हे काम ; प्रवीण तरडेने केली मित्रास मदत

दिनेश कानडे यांना आपण एक उत्तम अभिनेते म्हणून ओळखतो. मात्र यासोबतच ते बेस्टचे कर्मचारी देखील आहेत. नोकरी करत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली आहे. यासाठी बेस्टकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील त्यांची भूमिका देखील विशेष गाजताना दिसत आहे .घारतोंडे ही भूमिका विरोधी जरी असली तरी शेफालीमुळे होणाऱ्या त्यांच्यातील गमतीजमती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.

माझी तुझी रेशीमगाठ मधील सिम्मी, परी, शेफाली तसेच मुख्य भूमिकेत असणारे कलकारांची कमी काळात वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials, Zee Marathi, Zee marathi serial