मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Devdatta Nage : जय मल्हार ते आदिपुरूष! मराठमोळ्या अभिनेत्याची मोठी झेप

Devdatta Nage : जय मल्हार ते आदिपुरूष! मराठमोळ्या अभिनेत्याची मोठी झेप

देवदत्त नागे

देवदत्त नागे

अभिनेता प्रभासच्या आदिपुरूष सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. ज्यात मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. सिनेमासाठी अभिनेत्याचं प्रचंड कौतुक होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 03 सप्टेंबर :  साऊथ सुपरस्टार प्रभासच्या नव्या 'आदिपुरूष' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.  रामायणावर आधारीत सिनेमानं गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. ट्रेलर पाहून सिनेमा कसा असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे.  अभिनेता प्रभास श्री रामांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता सैफ अली खाननं रावण साकारला आहे. अभिनेत्री क्रीती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. या सगळ्यात प्रेक्षकांना खास सप्राइज मिळालं आहे. ते म्हणजे सिनेमात अनेक मराठी कलाकार आहेत. त्यातील एक चेहरा समोर आला आहे तो म्हणजे अभिनेता 'देवदत्त नागे'.

जय मल्हार मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला देवदत्त नागेनं हिंदी सिनेमात काम करायला सुरू केल्यानंतर त्यानं मोठी भरारी घेतली आहे. मराठी टेलिव्हिजनवर तो प्रसिद्ध होताच मात्र प्रभासबरोबर आदिपुरूषमध्ये राम भक्त आदिपुरुषच्या भूमिकेत देवदत्त प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हनुमानाच्या वेशातील देवदत्तचा पहिली लुक समोर आला आहे. त्याचप्रमाणे सिनेमात अभिनेत्री तेजस्विनी प्रधान देखील असल्याचं म्हटलं जात आहे पण तिचा लुक अजून समोर आलेला नाही.

हेही वाचा - Adipurush Teaser :'हा चित्रपट म्हणजे रामायणाचा अपमान'; 'आदिपुरुष'चा टीझर पाहून असं का म्हणतायत प्रेक्षक?

" isDesktop="true" id="768888" >

प्रभासचा आदिपुरूष हा सिनेमा थ्रीडी अँक्शन ड्राम आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात सिनेमात VFX चा वापर करण्यात आला आहे. सिनेमा हिंदीसह, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतनं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी ओमचा 'तानाजी' हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. तानाजी सिनेमातही अभिनेता देवदत्त नागेनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.

आदिपुरूषचा ट्रेलर पाहून अनेक जण कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. सिनेमातील अँक्शन सीन्सवर मोठा खर्च करण्यात आला आहे. विशेषत: सैफ अली खानच्या अभिनयाचं कौतुक होत आहे मात्र दुसरीकडे ट्रेलर पाहून प्रेक्षक चांगलेच वैतागल्याचं दिसत आहे. 'सिनेमा आहे की कार्टून', असा प्रश्न अनेकांना ट्रेलर पाहून पडला आहे. तर अनेकांनी 'हा रामायणाचा अपमान', असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी 'खराब VFX व्हिडीओ गेम पाहत असल्यासारखं दिसत आहे', असं म्हणत ट्रोल केलंय.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Marathi entertainment, Marathi news