• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • अनपेक्षित! ही मालिका लवकर घेणार प्रेक्षकांचा निरोप;अभिनेत्याची भावनिक पोस्ट

अनपेक्षित! ही मालिका लवकर घेणार प्रेक्षकांचा निरोप;अभिनेत्याची भावनिक पोस्ट

स्टार प्रवाहवरील नुकतीच सुरू झालेली ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हे आहे कारण..

  • Share this:
    मुंबई, 20 नोव्हेंबर- स्टार प्रवाहवरील नुकतीच सुरू झालेली ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसत आहे. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर येत आहे. भूषण प्नधानने (bhusha pradhan )एक पोस्ट केली आहे त्यामध्ये याचा उलगडा त्यानं केला आहे. भूषणची ही पोस्ट खूपच भावनिक आहे. भूषण प्रधानने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की,येतो आम्ही…मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस… इतक्या लवकर? अनपेक्षित होतं पण धक्कादायक नव्हतं! चित्रपट, वेब सिरीज ह्यांचं जरा बरं असतं… अमुक एक दिवसांनी आपल्याला ह्या पात्राची साथ सोडायची आहे हे माहित असतं. मालिकेचं तसं असेलच असं नाही. शेवटचा दिवस हा आजही असू शकतो किंवा सहा महिन्यांनी किंवा अनेक वर्षांनी. हयाआधीही ह्याचा अनुभव आल्याने कायमच सतर्क होतो. ‘भूषण, आजचा दिवस राजा म्हणून जगायला मिळतोय तो पूरेपूर जग’ स्वतःला रोज सांगायचो. मग दाढी मिशी चिकटवण्यासाठी चेहऱ्याला लावण्यात येणारा, एरवी नकोसा वाटणारा-झोंबणारा तो ‘बोरकर गम’ही अचानक गार वाटायचा. वाचा : भारी कोल्हापुरी! अमोल कोल्हेंनी 6 वर्षांनी या पदार्थावर मारला अस्सा ताव की... ‘जय भवानी जय शिवाजी’ ह्या मालिकेसाठी अक्खी टीम खूप कष्ट घेत होती.. मालिकेची दर्जेदार क्वालिटी बघून मजेत दिग्दर्शकाला म्हणायचो, ‘आम्हाला टि. व्ही. मालिका सांगून आमच्याकडून वेबसिरीज बनवून घेताय’! खरच… नेमकेच भाग झाले… 105!ह्याआधी अशी भूमिका करायला मिळाली नव्हती मात्र मिळाली ती योग्य वेळी! एक अभिनेता/ कलाकार म्हणून ही भूमिका पेलू शकतो अशाच वेळी. ‘येतोय आम्ही’ म्हणत पहिला प्रोमो रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या… चांगल्या, वाईट, कुत्सित! दुसऱ्या प्रोमोपासून प्रतिक्रिया अधिक सकारात्मक होत गेल्या आणि पहिल्या एपिसोडपासूनच भरभरून प्रेम मिळत गेलं ते कायमचं. अनेकांना आवडत असताना मालिका इतक्या लवकर संपतेय ह्याचं वाईट वाटावं… की प्रेक्षकांना मालिकेचा कंटाळा येण्याच्या आत मालिका संपतेय हयाचा आनंद?
    महाराजांची भूमिका करत असल्यामुळे अगदी कमी कालावाधीत बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. काही जाणीवपूर्वक तर काही अनवधानाने. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, परिस्थितीमध्ये काय बदल होतायत, येणाऱ्या अफवांमधे तथ्य असू शकते का, त्याची कारणं काय असू शकतात, असे अनेक विचार डोक्यात सुरु होते. आणि अशातच अचानक कळले की हा बाजींचाच नाही तर आपला आणि मालिकेचाही शेवटचा दिवस! धक्कादायक असूनही धक्का बसला नाही. खंबीर होतो… राजांमुळे, राजांसारखा! तयारी नव्हती, ती ह्या भूमिकेस अलविदा म्हणण्याची. काही क्षणात ह्या भूमिकेसाठी शेवटचे action आणि शेवटचे cut ऐकू येणार! तयारी? अजूनही नाही! डोळ्यातून अश्रू वाहणार? नाही… तू राजांच्या वेषात आहेस.. राजांच्या भूमिकेत आहेस… आणि राजाला रडण्याची मुभा नाही! अश्रू गाळायचे तर भूषण म्हणून… स्वतःच्या वेषात… स्वतःच्या भूमिकेत! घोडखिंडीतून राजे निघाले, बाजी प्रभूंस म्हणाले, ‘येतो आम्ही’… CUT!
    भूषणने यानंतर दुसरी इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, राजांच्या वेषातच सेटवर जाऊन आलो! कोणीच नव्हते तरीही सगळे होते… सगळ्या पात्रांस आठवून आलो… अलविदा म्हणून आलो… माँसाहेबांची खूप आठवण आली! आज त्या सेटवर नव्हत्या ते बरेच झाले.. राजाला रडता येत नाही; पण मुलाने आईसमोर अश्रू रोखायचे ते कसे? मेकअप काढला… कपडे बदलले! घरी आलो… अश्रू न रोखता आईस सांगायचे असे ठरवले! सांगितले… पण अश्रू? नाहीत!! दुसऱ्या दिवशी बाबांस सांगितले… अश्रू? नाहीत!!! शांत बसलो.. विचार केला! ह्याआधी एखाद्या भूमिकेची साथ सोडल्यावर मला रडू यायचं. मग आता का नाही?? उत्तर मिळालं… “साथ सोडलीय कुठे! ज्या विचारांच्या जवळ जाऊ शकलास ते विचार जप! त्या विचारांच्या रूपाने… आहोत आम्ही”! वाचा : 'जबरदस्त बंबात जाळच' : श्रुती मराठेच्या हॉट Photo वर सुपर हॉट कमेंट! ‘स्टार प्रवाह’ आणि ‘दशमी क्रिएशन्स’, तुम्ही ठेवलेल्या विश्वासाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज हयांची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा. तसेच आपण प्रेक्षकांनी भरभरून केलेल्या प्रेमासाठी धन्यवाद!
    Published by:News18 Trending Desk
    First published: