मुंबई, 30 मे: मराठी बिग बॉस (Marathi big boss) फेम आणि विनोदी अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) ची पत्नी कांदबरी कडू (Kadmbari Kadu) यांचं कोरोनामुळे (Corona) निधन झालं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 39 वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अभिनेता म्हणून भूषण कडू याची पत्नी कांदबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातील त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. पण, प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पत्नी कांदबरीच्या निधनामुळे कडू कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. भूषण यांना प्रर्किर्थ कडू हा 7 वर्षांचा मुलगा आहे. कादंबरी या भूषण कडू यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.
मिल्खा सिंग यांची तब्येत स्थिर, पत्नी निर्मलबाबत हॉस्पिटलनं दिलं अपडेट
विनोदी अभिनेता म्हणून भूषण कडू संपूर्ण महाराष्ट्राला परिचित चेहरा आहे. अनेक चित्रपट, नाट्य आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडी एक्स्प्रेस या मालिकेमधून भूषण कडूने सर्वांना खळखळून हसवलं. कलर्स वाहिनीवरील मराठीतील पहिल्या बिग बॉसमध्ये भूषण कडूने आपली दखल घेण्यास सर्वांना भाग पाडले होते.
'हा काळाने उगवलेला विलक्षण सूड', राऊतांचा मोदींना टोला
मराठी बिग बॉसच्या एका भागात कांदबरी आणि त्यांच्या मुलाची भेट दाखवण्यात आली होती. बिग बॉस मराठीची पहिली विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे हीने टीव्ही 9 मराठीशी बोलत असताना कांदबरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बिग बॉसच्या घरात त्यांची एंट्री झाली होती तेव्हा त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. भूषण इकडे असताना बाहेर तिने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती' अशी भावना मेघा धाडेनं व्यक्त केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.