Home /News /entertainment /

पैहचान कौन ? भरत जाधव यांनी शेअर केलेल्या 30 वर्षापूर्वीच्या फोटोत लपलेत तीन लोकप्रिय कलाकार

पैहचान कौन ? भरत जाधव यांनी शेअर केलेल्या 30 वर्षापूर्वीच्या फोटोत लपलेत तीन लोकप्रिय कलाकार

भरत जाधव यांनी एक असाच 30 वर्षापूर्वीचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत मराठी मनोरंजन विश्वातील तीन लोकप्रिय कलाकार लपलेले आहेत.

  मुंबई, 14 मार्च- नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेता भरत जाधवने (Bharat Jadhav) आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटवली आहे. भरत जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेकदा ते त्यांच्या कामासंदर्भात पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांसोबत नेहमी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी एक असाच 30 वर्षापूर्वीचा जुना  फोटो  (Bharat Jadhav Ltest post)  शेअर केला आहे. या फोटोत मराठी मनोरंजन विश्वातील तीन लोकप्रिय कलाकार लपलेले आहेत. भरत जाधव यांनी नाटकाच्या प्रयोगाला जात असतानाचा बसमधील एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, हा फोटो खुप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः ३० वर्षांपूर्वीचा. या बसमध्ये तीन जिवलग मित्र तीन वेगवेगळ्या विंडो सीट पाशी बसलेले आहेत. तिघेही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमाने झपाटलेले. आयुष्यात महत्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर हाऊ शकतं हे तिघांनीही अनुभवलंय..!" वाचा-'आशुतोष केळकर खरा आणि अनिरुद्धचाच राग का?', मिलिंद यांची पोस्ट चर्चेत भरत जाधव यांची ही पोस्ट वाचून अनेकांना प्रश्न पडला आहे की, ही नेमकी तिघं कोण आहेत. काहींनी कमेंट करत अंदाज देखील वर्तवला आहे. हे या फोटोत लपलेले तिघं दुसरे तिसरे कोण नाहीत तर अभिनेते जयराज नायर, दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी आहेत. तेव्हापासून यांची मैत्री आहे ..आजही त्यांची मैत्री टिकून आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

  भरत जाधव यांनी आजवर अनेक मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असून आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याने अनेक हिंदी चित्रपटात देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या