मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात रंगणार 28 जानेवारीपासून 'लकडाऊन'ची चर्चा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात रंगणार 28 जानेवारीपासून 'लकडाऊन'ची चर्चा

'लकडाऊन बी पॉझिटिव्ह'  (luck down be positive )या चित्रपटाची देखील प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीने (prajakta mali ) सोशल मीडियावरून याबद्दल माहिती दिली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर: प्रत्येक क्षेत्रावर कोरोनाचा परिणाम झाला आहे. पण आता हळूहळू का होईना सर्व पूर्व पथावर आलं आहे.आता चित्रपटप्रेमी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहांकडे वळले आहेत. यातच विविध चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा समोर येऊ लागल्या आहेत. यातच आणखी एक चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्जा आहे. इष्णव मीडिया हाऊसचा 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह'  (luck down be positive )या चित्रपटाची देखील प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीने (prajakta mali ) सोशल मीडियावरून याबद्दल माहिती दिली आहे.

प्राजक्ता माळीने इन्स्टावर तिच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सिनेमात प्राजक्तासोबत अभिनेता अंकुश चौधरी  (ankush chaudhary) देखील दिसणार आहे. लकडाऊन हा चित्रपट येत्या 28 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : पहिल्या शेवंताच्या तुलनेत नव्या अभिनेत्रीत काय आहे खास? UK मधून शिक्षण आणि...

चित्रपटाची कथा ही त्याच्या नावातच लपलेली आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अंकुश आणि प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसत आहेत. मात्र लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे लग्न करताना इतरांची धावपळ झाली त्याच्य़ासी साम्य असणारी या सिनेमाची कथा आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात एका लग्नाची ही धमाल गोष्ट आहे.

'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजित यांनी दिलं आहे. संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे.या चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केले आहे. चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment