मुंबई, 9 डिसेंबर - मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकित मोहन (Ankitt Mohan) आणि अभिनेत्री रुची सवर्ण हे नुकतेच आईबाबा बनले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 8 डिसेंबरला अंकित आणि रुची यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. अंकित मोहनने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अंकित मोहनने इन्स्टाग्रामवर स्टोरी सेक्शनमध्ये ही बातमी शेअर केली आहे. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी चाहतेही त्याचे सतत अभिनंदन करत आहेत.
अंकित मोहनने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. अंकित मोहनने आपल्या बाळाच्या जन्माचे अभिनंदन केल्याबद्दल आभार मानले आहेच. त्याने लिहिले, 'आम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद पाठवल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. कुटुंबातील आणखी एका सदस्यासाठी तुम्हा सर्वांचे प्रेम मिळत आहे...फक्त प्रेम प्रेम प्रेम... अंकित मोहन आधीच बाबा होण्यासाठी खूप उत्सुक होता. प्रेग्नेंसीची बातमीही त्याने चाहत्यांसोबत शेअर केली होती. अंकित मोहन आणि रुचीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये रुची तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.
वाचा : कतरिना-विक्कीच्या लग्नात पाहुण्यांसाठी या देशांमधून येणार भाजीपाला...पाहा PHOTOS
अंकितने पत्नी रूचीसोबत फोटो शेअर करत लिहिले होते की - 'शुभ प्रसंगी चांगली बातमी.. लवकरच एक नवीन आयुष्य येणार आहे. यासोबतच त्याने एका मुलाखतीत बाळाबद्दलही सांगितले होते. अंकित मोहनने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'माझी पत्नी रुची आणि मला आई-वडील बनताना खूप छान वाटत आहे. हे आमचे पहिले मूल आहे आणि ही खूप वेगळी आणि खास भावना आहे.
वाचा : 'आतुरता फक्त आजीच्या शिव्यांची' कारण सुरू आजी Is Back, Video
अंकित मोहन याने ‘फत्तेशीकस्त’, ‘फर्जंद’, ‘एक थी बेगम’, ‘महाभारत’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘हैवान’, ‘ कुमकूम भाग्य’ या मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. त्याच्या शरीर यष्टीमुळे मराठी चित्रपटातला बाहुबली अशीही ओळख त्याला मिळाली आहे. अंकितची पत्नी रुची सवर्ण ही देखील हिंदी मराठी मालिका अभिनेत्री आहे. ‘ सख्या रे’ या मराठी मालिकेतून तिने प्रियंवदा ची भूमिका साकारली होती. प्यार का बंधन, कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, घर आजा परदेसी अशा हिंदी मालिका तिने अभिनित केल्या आहेत. कुमकुम भाग्य सारख्या आणखी काही हिंदी मालिकेतून हे दोघेही एकत्रित झळकले होते.
2015 साली रुची आणि अंकित मोहन विवाहबद्ध झाले होते. हिंदी मालिकेत झळकल्यानंतर या दोघांनी मराठी सृष्टीकडे आपली पावले वळवली. अंकित मोहन हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. येत्या 31 डिसेंबर रोजी पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अंकीतचा आनंद आता आणखीनच द्विगुणित झालेला पाहायला मिळतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials