Home /News /entertainment /

अन् अमृता खानविलकरला भेटला विठ्ठल ......, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

अन् अमृता खानविलकरला भेटला विठ्ठल ......, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

चंद्रमुखी फेम अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

  मुंबई, 15 जून- दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer : Mukkam Post Thane Marathi Movie) या चित्रपटाची सगळीकडे सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमातील अभिनेता प्रसाद ओकच्या (Prasad Oak ) अभिनयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केलं आहे. आता चंद्रमुखी फेम अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं ( amruta khanvilkar latest post )  देखील तिच्या जवळच्या मित्रासाठी एक खास पोस्ट लिहित त्याच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे. अमृता खानविलकरनं प्रसाद ओकसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक करत तिनं म्हटलं आहे की, भेटला विठ्ठल ...... प्रिय प्रसाद..  गेल्या काही महिन्यांची गडबड धावपळ तुला माहितीच आहे तेव्हा ”धर्मवीर” बघायला उशीर झाला त्या साठी sorry पण कलाकृती अजरामर असेल तर ती कधी हि पहिली तरीही ती तितकीच प्रभावी असते ... काल “धर्मवीर” पहिला ... प्रसाद ओक शोधात होते पण तो कुठेच सापडला नाही ... सापडले ते दिघे साहेब ... मी त्यांना कधी पाहिलं नाही भेटले नाही पण काल ते हि घडला असं वाटलं ... ते डोळे ... हाव भाव ... बोलणं ... ते समर्पण 🙏🏻 तुझ्या सारख्या नटालाच हे जमू शकलं असतं आणि तू त्याचं सोनं केलंस. वाचा-'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर पाहून KRK एकदा नाही तर तीनवेळा खुर्चीवरून पडला? भोर च्या वाड्यात खुर्चीवर बसून ज्या कळकळीने मी तुला सांगत होते “ प्रसाद एक फिल्म तुझ्यातल्या नटा साठी कर रे ” ते ह्या चित्रपटात मी डोळे भरून बघितलं आणि अनुभवलं. हा चित्रपट खऱ्या अर्थाने तुझ्या साठी घडवणाऱ्या @pravinvitthaltarde चे मी मनापासून आभार मानते ….. तुला मी सांगू शकत नाही प्रसाद… तुला अशा प्रकारे पडद्यावर पाहून मला किती अभिमान आणि आनंद झाला आहे.स्वत:च्या प्रवासात इतरांनाही स्वत:ची जाणीव करून देऊन त्यांना त्यांच्या मार्गाकडे नेण्यास मदत करणारे फार कमी आहेत आणि तू असा माझा दुर्मिळ मित्र आहेस. फक्त तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर...अशी पोस्ट अमृतानं प्रसाद ओकसाठी लिहिली आहे.
  अमृताच्या या पोस्टवर प्रसाद ओकने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं आहे की, मनःपूर्वक आभार अमृता आणि खूप खूप प्रेम... गडबड...धावपळ... यापलिकडे जाऊन काम आवडणं महत्वाचं... ते आवडलं याचा खूप आनंद आहे...आणि या पुढे आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या सेट वर भोर मधे बोलली होतीस तेच वाक्य बोलत जा ❤️❤️❤️
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या