Home /News /entertainment /

'दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले...'; अमोल कोल्हेंची खास व्यक्तीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

'दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले...'; अमोल कोल्हेंची खास व्यक्तीसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

अभिनेता ते खासदार असा प्रवास करणारे डॉ अमोल कोल्हे ( amol kolhe )सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आज त्यांच्या लग्नाला 14 वर्षे झाली आहेत. यानिमित्त त्यांनी नेहमीप्रमाणे खास अंदाजात पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई, 6 डिसेंबर : अभिनेता ते खासदार असा प्रवास करणारे डॉ अमोल कोल्हे ( amol kolhe )सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. चाहत्यांसोबत ते विविध गोष्टी शेअर करत असतात. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते अगदी त्याप्रमाणे अमोल कोल्हे यांच्या आतापर्यंतच्य प्रवासात त्यांच्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. आज त्यांच्या लग्नाला 14 वर्षे झाली आहेत. यानिमित्त त्यांनी नेहमीप्रमाणे खास अंदाजात पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी सुंदर अशी पोस्ट देखील लिहिली आहे व काही फोटो देखील शेअर केले आहेत. अमोल कोल्हे यांनी या 14 वर्षाच्या प्रवासातील पत्नीसोबतच्या काही खास क्षणाचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, 14 वर्षे:-14वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहीत नाही पण 14वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे.. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना..दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत... ताटकळत...1) "तू चूक" आणि 2) "मीच बरोबर"....कारण तेवढं केलं की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो.. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!😊 त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. वाचा: 'मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढत...', स्नेहाने साधला जयवर निशाणा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत. शिरुर मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. वाचा: Bigg Boss Marathi च्या घरात यावेळी नो एलिमिनेशन मात्र पुढील आठवड्यात डब्बल एलिमिनेशन! अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. आता ते राजकारणात देखील सक्रिय झाले आहेत. त्यांच्या पत्नी अश्विनी कोल्हे या देखील डॉक्टर आहेत.२००७ साली त्यांनी अश्विनी यांच्यासोबत लग्न केले.
  View this post on Instagram

  A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

  डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ. अश्विनी कोल्हे यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचे नाव आद्या आहे तर मुलाचे नाव रुद्र. आद्याने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारली आहे.डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 'राजा शिव छत्रपती' या मालिकेत काम केले होते. त्यांना या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका केल्या आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या