• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अमोल कोल्हे यांनी घेतला एकांतवासात जाण्याचा निर्णय; इन्स्टा पोस्ट करतं सांगितलं कारण

अमोल कोल्हे यांनी घेतला एकांतवासात जाण्याचा निर्णय; इन्स्टा पोस्ट करतं सांगितलं कारण

अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी (Amol Kolhe) काही दिवसापूर्वी सोशल मीडिया वापरण्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देत यामागचं कारण सांगितलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर- अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी (Amol Kolhe) काही दिवसापूर्वी सोशल मीडिया वापरण्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी दुसरा एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती त्यांनी इन्स्टा पोस्ट करत दिली आहे. मनाचा आणि शऱीराचा व मानसिक थकवा घालवण्यासाठी त्यांनी काही काळ एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी इन्स्टा पोस्ट करत लिहिले आहे की, सिंहावलोकनाची वेळ:-गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने!!, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यासोबतच त्यांनी एक टीप देखील दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही😜.
  View this post on Instagram

  A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

  सोशल मीडिया वापरबद्दल घेतला होता हा निर्णय डॉ. अमोल कोल्हे अभिनयासोबत आता राजकारणात देखील उत्तम काम करताना दिसत आहेत. कधी कधी खासदार कधी अभिनय अशी दुहेरी जबाबदारी अमोल कोल्हे पेलताना दिसतात. अमोल कोल्हे यांनी यासंबंधी पोस्ट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी इन्स्टा पोस्ट करत म्हटलं होतं की, इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्ट वर प्रतिक्रिया देताना "अभिनेता" की "नेता"अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच एक निर्णय घेतला आहे- इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे confusion नको. राजकीय पोस्ट साठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना?.. वाचा : 'सोनम - रिया तुमची आठवण येतेय...'; अनिल कपूर यांची भावनिक पोस्ट स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने डॉ. अमोल कोल्हे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे गेल्या काही काळात ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्यामुळे नागरिक त्यांच्याकडे कायम आदराने पाहतात. याच इमेजचा फायदा उठवत अमोल कोल्हे यांनी मोदी लाटेतही लोकसभेची निवडणूक जिंकली. वाचा : संग्राम समेळ 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत साकराणार 'ही' भूमिका 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. यामध्ये अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. आतादेखील ते जेव्हा एखाद्या मुद्द्यावर बोलतात तेव्हा ग्रामीण भागात त्याची बऱ्यापैकी चर्चा रंगते.
  Published by:News18 Trending Desk
  First published: