मराठीतलं 'हे' सेलेब्रिटी कपल झालं Corona मुक्त, कशी होती त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज?

मराठीतलं 'हे' सेलेब्रिटी कपल झालं Corona मुक्त, कशी होती त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज?

'जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हाच आपल्याला त्या रोगाची तीव्रता समजते', असं सांगत त्यांनी अनुभव शेअर केले आहेत. ते दोघेही आता plasma दान करायला तयार झाले आहेत.

  • Share this:

पुणे, 30 सप्टेंबर: कोरोनाच्या विळख्यातून सामान्य लोकंच काय सेलिब्रिटीही सुटले नाहीत. अभिनेता आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी अभिनेता आलोक राजवाडेला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. तापामुळे तो बेजार झाला होता आणि त्याच्या तोंडाची चव गेली होती. त्याने लगेचच कोरोनाची टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. आलोकची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची पत्नी पर्ण पेठेनंही कोरोनाची चाचणी करुन घेतली. तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हे दोघंही नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत.

पर्णने Corona चे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलोक आणि पर्ण या दोघांनाही होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. कोरोनाचा अनुभव सांगताना आलोक म्हणाला, आम्ही काहाही खाल्लं तरीही आमच्या तोंडाला चव येत नव्हती. कागद खाल्यासारखं भास होत होता. कोरोना झाला असताना आम्हाला वासही येत नव्हते. पर्ण आणि आलोक आता पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरही पर्ण आणि आलोक काही वेळ होम क्वारंटाईन राहिले होते. कोरोनातून बरं वाटल्यानंतर जेव्हा आमची वास घेण्याची क्षमता परत आली तेव्हा कुठे आम्हाला हायसं वाटलं, आमच्या मित्रांपैकी ज्यांना कोरोना झाला होता त्यांचेही अनुभव आम्ही आम्ही ऐकत होतो. पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हाच आपल्याला त्या रोगाची तीव्रता समजते. असा अनुभव आलोकने शेअर केला.

कोरोनामुक्त झाल्यानंतर आता दोघंही प्लाझा डोनेट करणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा. कोणत्याही वस्तूला स्पर्श करताना सॅनिटायझर वापरा. कोरोनासारख्या रोगाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका असता सल्लाही पर्णने तिच्या चाहत्यांना दिला आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: September 30, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading