‘हा’ मराठमोळा अभिनेता होणार अरुण गवळीचा जावई! साखरपुडा उरकला

‘हा’ मराठमोळा अभिनेता होणार अरुण गवळीचा जावई! साखरपुडा उरकला

अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हिचा नुकताच साखरपुडा झाला. योगिताने एका प्रसिध्द मराठमोळ्या अभिनेत्याशी साखरपुडा केला.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर : मुंबईमध्ये आजही डॅडी हे नाव घेतले की गॅंगस्टर अरुण गवळी यांचे नाव समोर येते. एकेकाळी दगडी चाळीतून मुंबई चालवणारे अरुण गवळी सध्या कमलाकर जामसंडेकर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मात्र दुसरीकडे अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हिचा नुकताच साखरपुडा झाला. योगिताने एका प्रसिध्द मराठमोळ्या अभिनेत्याशी साखरपुडा केला.

‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’ या मराठी चित्रपटांत काम करणाऱ्या अक्षय वाघमरे या अभिनेत्यानं योगिता गवळीशी साखरपुडा केला. हा साखरपुडा समारंभ जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारासह एका हॉटेलमध्ये पार पडला. अक्षय आणि योगिता एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळकत होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला.

योगिता आणि अक्षयच्या साखरपुडा समारंभाला काही मराठी अभिनेत्यांनी हजेरी लावली. योगिता आणि अक्षयने फेब्रुवारी २०२० मध्ये विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे टाईम्सला दिलेल्या माहितीत अक्षयनं, ‘मी योगिताला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. जेव्हा आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला विवाह बंधनात अडकण्याचा सल्ला दिला तेव्हा आम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघे ही आनंदी आहोत’ असे सांगितले.

Published by: Priyanka Gawde
First published: December 23, 2019, 7:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading