मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Takatak 2 tariler: इंद्राजींचा कधीही न पाहिलेला धमाल कॉमेडी अवतार; टकाटक 2 ट्रेलर आउट

Takatak 2 tariler: इंद्राजींचा कधीही न पाहिलेला धमाल कॉमेडी अवतार; टकाटक 2 ट्रेलर आउट

सध्या तरुणाईमध्ये अजिंक्य राऊत या अभिनेत्याची बरीच क्रेझ दिसून येत आहे. मालिकेतील अवतारापेक्षा एका वेगळ्याच रूपात तो या सिनेमात दिसणार आहे.

सध्या तरुणाईमध्ये अजिंक्य राऊत या अभिनेत्याची बरीच क्रेझ दिसून येत आहे. मालिकेतील अवतारापेक्षा एका वेगळ्याच रूपात तो या सिनेमात दिसणार आहे.

सध्या तरुणाईमध्ये अजिंक्य राऊत या अभिनेत्याची बरीच क्रेझ दिसून येत आहे. मालिकेतील अवतारापेक्षा एका वेगळ्याच रूपात तो या सिनेमात दिसणार आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 10 ऑगस्ट: मराठीमध्ये अडल्ट कॉमेडी हा विषयाकडे लक्ष देणाऱ्या कलाकृती तशा कमी बघायला मिळतात. पण सध्या या जॉनरमध्ये एक नवा सिनेमा एंट्री घेताना दिसणार आहे. प्रथमेश परबच्या टकाटक सिनेमाने चाहत्यांना अक्षरशः वेडं करून सोडलं होतं. याच सिनेमाचा दुसरा भाग म्हणजे टकाटक 2 आता सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे ठोक्या या पात्रासह आता त्याचे दोन मित्र सुद्धा गॅंगमध्ये ऍड झाले आहेत. आणि त्यातील एक पात्र चाहत्यांचा लाडका इंद्रा म्हणजे अजिंक्य राऊत साकारताना दिसणार आहे. यामध्ये अजिंक्य एका न पाहिलेल्या अवतारात दिसून येणार आहे. तसंच प्रथमेश परब, अजिंक्य राऊत आणि अक्षय केळकर या तीन मित्रांची गोष्ट सुद्धा यामध्ये दिसून येणार आहे. सिनेमाचा विषय थोडासा अडल्ट कॉमेडीकडे झुकणारा असेल तरी सिनेमामध्ये धमाल, अफलातून एंटरटेनमेंटचं फुल्ल पॅकेज असणार आहे. तसंच तीन मुलांच्या आयुष्यात फुलत जाणारं प्रेम सुद्धा यामध्ये दिसून येईल. प्रथेमश परब, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे अशी धमाल स्टारकास्ट सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज सुबोध भावे या अभिनेत्याच्या हस्ते लाँच करण्यात आला. सिनेमाच्या धमाल गंगणे सुबोधसह एक खास व्हिडिओ सुद्धा शेअर केला. यामध्ये आधी अडल्ट कॉमेडीचा सिनेमा आणि त्याचा ट्रेलर मी लाँच करणार नाही असं सुबोध त्यांना सांगतो पण त्याला सुद्धा ट्रेलर खूप आवडतो असं यामध्ये दाखवलं आहे. एकूणच ट्रेलर हा कॉमेडी आणि इमोशनने परिपूर्ण आहे. सध्या या सिनेमाचं प्रमोशन सुद्धा जोरदार सुरु असून तरुणाईमध्ये या सिनेमाची क्रेझ दिसून येत आहे.
View this post on Instagram

A post shared by Takatak Film (@takatakfilm)

अजिंक्य राऊतला एका आगळ्या वेगळ्या रूपात बघायला चाहते उत्सुक आहेत. तसंच दगडू आणि पालवीच्या लव्हस्टोरीने थेटरमध्ये धिंगाणा घातल्यानंतर आला प्रथमेश सुद्धा भन्नाट पात्र साकारताना दिसणार आहे.
First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Tv actors

पुढील बातम्या