Home /News /entertainment /

जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतोय हा प्रसिद्ध मराठी अभिनेता

जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतोय हा प्रसिद्ध मराठी अभिनेता

मराठी अभिनेता अभिजीत केळकर कोरोना संक्रमित झाला असून तो ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे

  ठाणे, 03 सप्टेंबर : कोरोनाने (Coronavirus) देशभरात हाहाकार मांडला आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला या काळात या ना त्या कारणामुळे फटका बसला आहे. देशातील दिग्गज देखील कोरोनाच्या विळख्यातून वाचू शकले नाही आहेत. बॉलिवूडपासून अगदी मराठी इंडस्ट्री देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. मात्र या दरम्यान उपचारासाठी सरकारी रुग्णालयांबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येतात. असे असून देखील मराठी अभिनेता अभिजीत केळकर (Abhijit Kelkar) ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. याठिकाणी येणाऱ्या गोरगरिब रुग्णांची संख्या अधिक आहे. असे असून देखील अभिजीतने याच रुग्णालयाला उपचारासासाठी पसंती दिली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधून विविध कलाकारांनाा कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर हे लोण मराठी इंडस्ट्रीपर्यंत येऊन देखील पोहोचले. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), त्याची पत्नी आणि मुलगा देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आता अभिनेता अभिजीत केळकर देखील कोरोना संक्रमित झाला आहे. अभिजीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तो ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
  View this post on Instagram

  ...नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली... माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती... डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली... त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे... माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद...

  A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial) on

  (हे वाचा-दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचे कोरोनामुळे निधन, बुधवारी घेतला अखेरचा श्वास) अभिजीतमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नाही आहेत. त्याला प्रिफॅब्रिकेटेड पोर्टेबल कंटेनरमध्ये ठेवण्यात आले आहे. अभिजीतची प्रकृती व्यवस्थित असल्याची प्रतिक्रिया जिल्हा सामान्य रुग्णायलाने दिली आहे. त्याने अशा संकटाच्या काळात जिल्हा सामान्य रुग्णालयाची निवड केल्याने अनेकांचे मत बदलण्यास मदत होईल. दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अभिजीत केळकरची सिंगिंग स्टार या रिअॅलिटी शोमधील प्रतिस्पर्धक पूर्णिमा डे (Purnima Dey) देखील कोरोना संक्रमित झाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे शूटिंग 10 सप्टेंबरपर्यंत थांबवण्यात आले आहे. सध्या आधीच शूट करण्यात आलेले एपिसोड दाखवण्यात येणार आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या