मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'पगार 25 हजार, फॉर्च्युनरचा हप्ता 30 हजार. नाही हो परवडत', आस्ताद काळेचा नगरसेवकांना टोला

'पगार 25 हजार, फॉर्च्युनरचा हप्ता 30 हजार. नाही हो परवडत', आस्ताद काळेचा नगरसेवकांना टोला

काही दिवसांपूर्वी आस्ताद काळेने (Aastad kale) निवडणुका, प्रचारसभा यावर भाष्य केलं होतं.

काही दिवसांपूर्वी आस्ताद काळेने (Aastad kale) निवडणुका, प्रचारसभा यावर भाष्य केलं होतं.

काही दिवसांपूर्वी आस्ताद काळेने (Aastad kale) निवडणुका, प्रचारसभा यावर भाष्य केलं होतं.

मुंबई 29 एप्रिल : अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale)  सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे चांगलाच चर्चेत आहे. आस्ताद  स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीड भूमिकेसाठी मनोरंजन विश्वात ओळखला जातो. अनेक विषयावंर तो भाष्य करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी आस्तादने कोरोना काळात पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या विधानसभा निवडणुका, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेल्या प्रचारसभा यावर भाष्य केले होतं. (Aastad posted on insta) तर आता त्याने एक वेगळी पोस्ट करत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

आस्तादने आता थेट नगरसेवकांवर निशाना साधला आहे. त्यांचं राहणीमान आणि पगारावरून टोला लगावला आहे.

पोस्टमध्ये आस्ताद म्हणाला, "आता महाराष्ट्रातील नगरसेवकांचा पगार (सरकारी पगार) हा फारफार तर 25000/-  रुपये इतका आहे. अ दर्जाच्या महापालिकांमधील. ज्यात पुणे, मुंबई, आणि नागपूर येतात'

आता पुण्यात, मुंबईत मी खूप राहिलो आहे. 25000 रुपयांत हे असं राहणीमान नाही हो परवडत!!!.....Fortuner चा हफ्ताच 30000 /- वगैरे असेल!! (जर द्यायचा असेल तर अर्थात!!) #चलाप्रश्नविचारुया

हे वाचा - VIDEO : लग्नसमारंभात अरेरावी करणाऱ्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर सोनू निगम संतापला

आस्तादच्या या पोस्टनंतर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत तर आस्तादला साथदेखील दिली आहे. एकाने म्हटलं, "प्रश्न लाख विचारू पण उत्तरं मिळतील का?"  यावर आस्ताद म्हणाला, "मिळतील. खरंच लाखोंनी विचारले प्रश्न, एक होऊन विचारले, तर मिळतील. पण त्या आधी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. जात/धर्म/पंथ/भाषा/प्रांत हे सगळं सोडून Taxpayer / करदाता, म्हणजेच लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून एक व्हायला हवं."

हे वाचा -   Coronavirus Crisis: पुण्यात मराठी कलाकार सरसावले; 'पाठक बाई', 'फास्टर फेणे' थेट पोलीस स्टेशनात, पाहा VIDEO

आस्ताद नुकताच 'चंद्र आहे साक्षीला' (chandra ahe sakshila) या मालिकेत झळकला होता. काही दिवसांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

First published:

Tags: Actor, Marathi cinema, Marathi entertainment