Home /News /entertainment /

'कोरोनावर उपाय मिळेल पण काहीतरी आणि कसंतरी होतंय यावर नाही' ; प्रशांत दामलेंच्या VIDEO वर चाहत्याची भन्नाट कमेंट

'कोरोनावर उपाय मिळेल पण काहीतरी आणि कसंतरी होतंय यावर नाही' ; प्रशांत दामलेंच्या VIDEO वर चाहत्याची भन्नाट कमेंट

प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकताच एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ नवीन प्रोजक्टशी संबंधीत असल्याचे दिसून येत आहे. नेमकं नाटक की टीव्ही शो याचा उलगडा मात्र केलेला नाही.

  मुंबई, 10 फेब्रुवारी- अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle)सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. विशेष करून ते त्यांच्या आगामी प्रोजक्टेची माहिती चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या आगामी प्रोजेक्टशी संबंधीत असल्याचेच दिसून येत आहे. प्रशांत दामले यांनी इन्स्टावर एक व्हिडिओ  (Prashant Damle latest video)पोस्ट करत म्हटलं आहे की, काय करूयात आता ??... प्रशांत दामले म्हणतान दिसत आहेत की, वास तर येतोय...हे एक ठीक आहे पण हल्ली ना काय होतय तेच कळच नाही. सारखं काही तरी होतय..कळलं तर सांगता येत नाही..सांगता आलं तर पटत नाही..मग हे डेंजर आहे ना..सगळे जण म्हणत आहेत.. सारखं काही तरी होत आहे. बघा बाबा.. असं म्हणत त्यांचा व्हिडिओ संपतो. या व्हिडिओच्या शेवटी लवकरच भेटुयात अशी एक पाटी येते. यावरूनच एकच लक्षात येते की, हा व्हिडिओ त्यांच्या नवीन प्रोजक्टशी संबंधीत आहे. नेमके हे नाटक आहे की मालिका आहे याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. प्रेक्षकांनी मात्र यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.
  एका नेटकऱ्यांने म्हटलं आहे की, ह्याच्या वर डॉक्टरांकडे पण औषध भेटणार नाही 😂 😂 😂 अजून डॉक्टरांनी पण त्यावर शिक्षण घेतलेले नाही 😂 😂 😂 तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, काहितरी आणि कसतरी च होतय.. असेच आणखी एकाने म्हटलं आहे की, एकवेळ कोरोनावर उपाय मिळेल पण हे "काहीतरी आणि कसंतरी होतंय" यावर उपाय नाही 😂😂 तर एकाने म्हटलं आहे कीस नवीन नाटक होतंय?.. वाचा-'या' दिग्दर्शकाने गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, बायको आहे मोठी उद्योजिका कोरोना काळात अनेकांना असंच काही होत होते. प्रत्येकाला नवीन काय तरी होत होते. याचा संबंध नेटकऱ्यांनी देखील कोरोनाशी लावला आहे. कदाचित कोरोनवर आधारितच प्रशांत दामले यांचा आगामी प्रोजेक्ट असावा. प्रेक्षक मात्र त्यांच्या या नवीन प्रोजेक्टसाठी उत्साही असल्याचेच कमेंटवरून दिसत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या