मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बाॅलिवूड ते मराठी सिनेमा, कसा झाला पद्मिनी कोल्हापुरेंचा 'प्रवास' ?

बाॅलिवूड ते मराठी सिनेमा, कसा झाला पद्मिनी कोल्हापुरेंचा 'प्रवास' ?

 'चिमणी पाखरं'नंतर 14 वर्षांनी पद्मिनीताई मराठी सिनेमात भूमिका साकारतायत. त्यानिमित्त आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.

'चिमणी पाखरं'नंतर 14 वर्षांनी पद्मिनीताई मराठी सिनेमात भूमिका साकारतायत. त्यानिमित्त आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.

'चिमणी पाखरं'नंतर 14 वर्षांनी पद्मिनीताई मराठी सिनेमात भूमिका साकारतायत. त्यानिमित्त आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.

    मुंबई, 24 आॅक्टोबर : ' प्रवासची कथा मला खूप आवडली. त्यात सामाजिक संदेशही आहे. शिवाय सिनेमाचे दिग्दर्शक शशांक यांच्याशी बोलल्यावर जाणवलं, सिनेमा कसा बनणार याबद्दल त्यांच्याकडे सुस्पष्टता आहे. म्हणून मी सिनेमा स्वीकारला, ' प्रवास सिनेमामागची आपली भूमिका पद्मिनी कोल्हापुरेंनी स्पष्ट केली. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'प्रवास'चं शूटिंग सुरू आहे. 'चिमणी पाखरं'नंतर 14 वर्षांनी पद्मिनीताई मराठी सिनेमात भूमिका साकारतायत. त्यानिमित्त आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.

    अशोक सराफ यांच्यासोबत पद्मिनीताई पहिल्यांदा काम करतायत. त्याचा एक किस्सा त्या सांगतात. ' अशोक मामांचा पहिला सिनेमा पांडू हवालदार हे मला कळलं, तेव्हा मी उडालेच. कारण मी या सिनेमाची खूप फॅन होते.' आपल्या आवडत्या कलाकाराबरोबर काम करायला मिळतंय, याचाही आनंद पद्मिनीताईंना वाटतोय. पद्मिनीताई सांगतात, ' सेटवर एकदम विनोदी वातावरण असतं. खूप मजा येते.' प्रवास एका मध्यवर्गीय कुटुंबाची गोष्ट आहे.

    चिमणी पाखरंनंतर पुन्हा मराठी सिनेमा करायला त्यांनी इतका वेळ का लावला? त्यावर त्या म्हणाल्या, ' मला तशी कथा क्लिक झाली नाही. आणि आजही चिमणी पाखरं सिनेमाची आठवण लोक काढतात. माझ्यासाठीही तो महत्त्वाचा सिनेमा आहे.'

    पद्मिनी कोल्हापुरेंना आपण बाॅलिवूडची अभिनेत्री म्हणून ओळखतो.  त्यांचा प्रेमरोग आणि आहिस्ता आहिस्ता सिनेमे तर प्रचंड हिट होते. अगदी अलिकडचा फटा पोस्टर निकला हिरो सिनेमात त्यांनी काम केलं होतं. मराठी सिनेमाकडे त्या कसं पाहतात? ' मराठी प्रेक्षक हुशार आणि चोखंदळ आहे. त्यांना डोक्यात ठेवून कुठला सिनेमा घ्यायचा याचा विचार करावा लागतो.'

    बाॅलिवूडचे बरेच जण आता मराठी सिनेमांकडे वळतायत. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, 'हिंदी सिनेमानंतर मराठी सिनेमे आता गाजायला लागलेत. बाॅलिवूडनंतर मराठी सिनेमे हिट होतायत. त्यामुळे आता सगळ्यांना आकर्षण वाटायला लागलंय. एखादा सामाजिक संदेश द्यायचा असेल तर मराठी सिनेमा निवडला जातोय.'

    हिंदी असो वा मराठी सिनेमा, पद्मिनीताईंना सिनेमाच आवडतो. पद्मिनी कोल्हापुरे आशुतोष गोवारीकरांच्या पानिपत सिनेमात काम करतायत. या ऐतिहासिक सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबरपासून सुरू होतंय.

    हिंदीमध्ये इतके सिनेमे केल्यानंतर त्यांचा आवडता सिनेमा कुठला?  यावर त्यांनी प्रेमरोग, आहिस्ता आहिस्ता, वो सात दिन, सौतन सिनेमांची नाव घेतली. राज कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, संजय दत्त, जॉकी श्रॉफ, राज बब्बर, कुमार गौरव ते शाहीद कपूरपर्यंतचा हा प्रवास खरंच अथांगच म्हणावा लागेल. त्यांनी ग्लॅमरस, सोशिक, वात्सल्यासोबत विविध जातकुळीच्या भूमिका जिवंत केल्या आहेत. आता त्यांचा हा 'प्रवास'ही नक्कीच अर्थपूर्ण असेल.

    #MeToo : आलिया भट्टच्या आईवरही झाला होता बलात्काराचा प्रयत्न

    First published:

    Tags: Marathi acteress, Marathi film, Padmini kolhapure, Pravas