Home /News /entertainment /

VIDEO: बिहारी भावंडांनी गायलेला मराठी अभंग सोशल मीडियावर हिट! जगभरातून वाढतायत VIEWS

VIDEO: बिहारी भावंडांनी गायलेला मराठी अभंग सोशल मीडियावर हिट! जगभरातून वाढतायत VIEWS

मुळची मधुबनी, बिहारची असणाऱ्या मैथिली ठाकूरने 'माझे माहेर पंढरी' हा अभंग गात आता मराठी चाहत्यांचे देखील मन जिंकले आहे.

    मुंबई, 21 मे : गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील 3 भावंडाचे गाण्याचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तबला, ढोलकी आणि पेटीच्या साहाय्याने विविध प्रकारचे संगीत त्यांच्या प्रेक्षकांना ऐकवतात.  मैथिली ठाकूर, रिषव ठाकूर आणि अयाची ठाकूर अशी या तीन भावंडांची नाव असून 2017 सालापासून त्यांची प्रसिद्धी वाढत गेली. त्याचदरम्यान त्यांनी युट्यूबवर त्यांचे गाण्याचे व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. तिघांचेही युट्यूबवर अकाऊंट असून त्यांचे काही फॅनपेज देखील बनवण्यात आले आहेत. मात्र सध्या जास्त चर्चा आहे ती मैथिलीने गायलेल्या मराठी अभंगाची. या 'ठाकूर भावंडां'नी चक्क मराठी अभंग गात त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. मुळची मधुबनी, बिहारची असणाऱ्या मैथिलीने 'माझे माहेर पंढरी' हा अभंग गात आता मराठी चाहत्यांचे देखील मन जिंकले आहे. (हे वाचा-राणा दग्गुबतीचं चाहत्यांना गोड सरप्राइज, लॉकडाऊनमध्ये उरकला साखरपुडा; पाहा PHOTO) मैथिलीला यावेळी तबल्याची साथ तिचा भाऊ रिषव ठाकूर याने दिली आहे. मैथिलीने केलेले मराठी शब्दांचे स्पष्ट उच्चार कौतुकास्पदच आहेत. त्या त्रिकुटाच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या या नव्या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. महाराष्ट्रातून यावेळी त्यांना विशेष प्रेम मिळाले आहे. आतापर्यंत जवळपास 2 लाख 40 हजारापेंक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर 25 हजार जणांनी लाइक देखील केले आहे. कलर्स टीव्हीवर प्रसारित झालेल्या 'रायझिंग स्टार' या कार्यक्रमातून मैथिली ठाकूर हे नाव पुढे आलं होतं. या कार्यक्रमात मैथिली जरी अवघ्या 2 मतांनी दुसरी आली असली तरी वयाच्या 19 व्या वर्षी मैथिलीने एक चांगली फॅन फॉलोविंग कमावली आहे. एकंदरित ठाकूर भावंडाचा मोठा चाहतेवर्ग निर्माण झाला आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. भोजपुरी, छठ गीत, कजरी गाणाऱ्या मैथिलीचा हा मराठी अभंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. संकलन, संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या