दीपवीरच्या रिसेप्शनला समोर आल्या बाॅलिवूडच्या लव्ह स्टोरीज!

दीपवीरच्या रिसेप्शनला समोर आल्या बाॅलिवूडच्या लव्ह स्टोरीज!

दीपिका आणि रणवीर सिंगच्या प्रेमकथेचं रूपांतर लग्नात झालं. पण या पार्टीत बऱ्याच लव्ह स्टोरीज समोर आल्या.

  • Share this:

शिखा धारिवाल, प्रतिनिधी

मुंबई, 2 डिसेंबर : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचं मुंबईतलं रिसेप्शन धमाकेदार झालं. दीपिका रेड गाऊनमध्ये खूप वेगळी दिसत होती. रणवीर-दीपिका खूपच आनंदात दिसत होते.

दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत मुकेश अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी, ईशा अंबानी, राधिका मर्चंट हजर होतेच, शिवाय क्रिकेट-बाॅलिवूडच्या हस्ती उपस्थित होत्या.

क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी ,क्रिकेटर  कपिल देव ,सुजीत सरकार ,जावेद अख़्तर , हृतिक रोशन ,रेखा ,बोनी कपूर,सोहा अली खान ,कुणाल खेमु ,रोहित शेट्टी ,संजय दत्त ,मान्यता दत्त ,सैफ़ अली खान ,सारा अली खान ,करीना कपूर खान ,किरण राव ,इम्तिहाज अली ,जोया अख़्तर ,जूही चावला ,रानी मुखर्जी  ,वाणी कपूर ,शिल्पा शेट्टी ,जानवी कपूर ,अरशद वारसी ,कल्कि कोचलीन ,रोहित शेट्टी ,अब्बास मस्तान ,अनिल कपूर ,फ़रहाँ खान ,कृति सेनन,सोनी राजदान, डायना पेंटी, वरुण धवन ,मलाईका अरोरा,रवीना टंडन यांच्याबरोबर अमिताभ बच्चन ,ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन ,श्वेता बच्चन नंदा ही मंडळीही वधूवरांना शुभेच्छा द्यायला पोचले.

दीपिका आणि रणवीर सिंगच्या प्रेमकथेचं रूपांतर लग्नात झालं. पण या पार्टीत बऱ्याच लव्ह स्टोरीज समोर आल्या. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर एकमेकांचा हात हातात घालून आले. या दोघांचं अफेअर गेले काही महिने सुरू आहे.

अरबाज खान आपली गर्लफ्रेंड जाॅर्जियासोबत पोचले. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज आणि जाॅर्जियाचं नातं समोर आलं.

रणवीरला शुभेच्छा द्यायला त्याची गर्लफ्रेंड अनुष्काही पोचली. तिचा अंदाज काही अनोखाच होता.

दीपवीरची गेस्ट लिस्ट खूप मोठी होती. यातलं एक जण असा होता, ज्याच्या स्टाइलचे आजही सगळे वेडे आहेत. अशी बातमी होती की डिप्रेशनमुळे हनी सिंग मीडियापासून दूर होता. पण या पार्टीत तो सगळ्यांना दिसला.

हनी सिंग थोडा जाडा झालाय. अभिनेत्री प्रिती झिंटाही आपल्या पतीसोबत पोचली होती. बाॅलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितही दीपवीरना शुभेच्छा द्यायला पोचली.

दीपवीरच्या लग्नात रात्री उशिरा पोचले अमिताभ, ऐश्वर्या, शाहरुख! पहा photos

First Published: Dec 2, 2018 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading